कर्नाटक सरकारचा निषेध; छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास दुग्धाभिषेक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथील सदाशिव नगरातील अश्वारुढ पुतळ्यावर कन्नड गुंडानी शाई मारुन विटंबना केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथील सदाशिव नगरातील अश्वारुढ पुतळ्यावर कन्नड गुंडानी शाई मारुन विटंबना केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवप्रेमींनी एकत्र येऊन कर्नाटक सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी उपमहापौर पद्माकर काळे, कार्याध्यक्ष संतोष पवार, महिला अध्यक्ष सुनिता रोटे, कार्याध्यक्ष लता ढेरे, सिया मुलांनी, लता फुटाणे, अश्विनी भोसले, राजन जाधव, चंद्रकांत पवार, आंनद मुसतारे, गफूर शेख, राजू कुरेशी, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निशांत साळवे, शाहरुख हुच्छे, यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवप्रेमींना ताब्यात घेतले.