ही तर कर्नाटक सरकारची दडपशाही; मविआ नेत्यांना कर्नाटक सीमेवर अडवलं, पोलिसांसोबत झटापट

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मगराळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

    एकीकडे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याचे अधिवेशन सुरू असताना दोन्ही राज्याच्या महत्वाच्या प्रश्नावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्यास तयार आहेत. अशातच महाराष्ट्र कर्नाटक सिमाप्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील मविआ नेते आग्रही आहेत. या पार्श्वभुमीवर कर्नाटक सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, हे मेळावा उधळून लावण्यासाठी कर्नाटक सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याच दिसत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या मविआच्या नेत्यांना मज्जाव करण्यात आल्याचं समजतयं.

    मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून दरवर्षी बेळगावात महामेळावा आयोजित करण्यात येतो. मात्र आज होणारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळावा रद्द करण्यात आला आहे. कर्नाटक पोलिसांकडून ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आली असून महामेळावा रोखण्यासाठी परिसरात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. कर्नाटक पोलिसांकडून दडपशाही सुरू असून, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू केली आहे.

    हा महामेळावा रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे. मेळाव्याच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी उभारण्यात आलेला मंडपही हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

    एकीकरण समिती नेत्यांची धरपकड

    महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला रोखण्यासाठी कर्नाटक पोलीस आणि तेथील प्रशासनानं दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचं दिसतं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मगराळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.