धनंजय मुंडेनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

धनंजय मुंडेनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या असा खळबळजनक आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. करुणा मुंडेंच्या या आरोपांमुळे  राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे(Karuna Munde's sensational allegation against Dhananjay Munde).

    कोल्हापूर : धनंजय मुंडेनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या असा खळबळजनक आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. करुणा मुंडेंच्या या आरोपांमुळे  राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे(Karuna Munde’s sensational allegation against Dhananjay Munde).

    व्यैयक्तीक वादामुळे चर्चेत आलेल्या करुणा मुंडे या आता थेट निवडणुीच्या रिंगणात उतरल्या आहेत. जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा करुणा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

    कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक लढवण्याचा निर्णय करुणा मुंडे यांनी घेतला आहे.  करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेउन त्यांनी  उमेदवारी अर्ज भरला.  देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.  कोल्हापुरातील घराणेशाही तील राजकारण संपवणार. त्यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला आहे.

    करुणा आणि धनंजय यांची प्रेम कहानी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे.  धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली,
    अनेक बायका त्यांनी लपवल्या, त्यामुळे अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी त्यांना येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही असे वक्तव्य करुणा मुंडे यांनी केले.