खंडाळ्याचा शिवांश ‘इंडियन टॅलेंट सर्च’मध्ये राज्यात पहिला

खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा शिवांश हा विद्यार्थी असून, तो इयत्ता दुसरीत शिकत आहे. त्याने इंडियन टॅलेंट सर्चमध्ये २०० पैकी १९४ गुण मिळवून राज्यात पहिला, मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये १५० पैकी १४६ गुण मिळवून राज्यात तिसरा, तर नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत २०० पैकी १८४ गुण प्राप्त करत, राज्यात ९ वा क्रमांक पटकावला आहे.

    खंडाळा : खंडाळा येथील शिवांश काळभोर (Shivansh Kalbhor) याने ‘इंडियन टॅलेंट सर्च’मध्ये (Indian Talent Search) उत्कृष्ट यश संपादन करत राज्यात पहिला क्रमांक पटकावला.

    खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा शिवांश हा विद्यार्थी असून, तो इयत्ता दुसरीत शिकत आहे. त्याने इंडियन टॅलेंट सर्चमध्ये २०० पैकी १९४ गुण मिळवून राज्यात पहिला, मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये १५० पैकी १४६ गुण मिळवून राज्यात तिसरा, तर नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत २०० पैकी १८४ गुण प्राप्त करत, राज्यात ९ वा क्रमांक पटकावला आहे.

    शिवांश काळभोर यास शिरीष काळभोर, प्रतिभा काळभोर, मुख्याध्यापिका निर्मला पवार, वर्गशिक्षिका राणी भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. तर शिवांश याच्या यशाबद्दल विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.