एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम, आझाद मैदानातील आंदोलनातून बाहेर पडण्याचा खोत-पडळकरांचा निर्णय, कर्मचारी मात्र संपावर ठाम, आता नेतृत्व सदावर्तेंकडे

  मुंबई : गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कामगारांच्या संपाबबात आणि आंदोलोनाबाबत संभ्रमाची भूमिका निर्माण झाली आहे. परिवहनमंत्री निल परब यांनी बुधवारी वेतनवाढीची घोषणा केल्यानंतर, खोत आणि पडळकरांनी आंदोलन मागे घेतले जाईल अशी भूमिका घेतली होती. दुसरीकडे आझाद मैदानावरील दोलोकांनी मात्र विलिनीकरणाशिवाय माघार नाही अशी भूमिका घेतली होती. आज सकाळी यावर निर्णय़ होणे अपेक्षित होते. मात्र आंदोलोनातून माघार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

  खोत- पडळकर आंदोलनातून बाहेर 

  परिवहनमंत्र्यांनी दिलेल्या वेतनवाढीनंतर कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका सोडावी, अशी भूमिका सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी घेतली होती. मात्र कामगार विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठान आहेत. अखेर सदाभाऊ खोत आणि पडकर यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय़ घेतला आहे. आझाद मैदानावरील आंदोलन तूर्तास स्थगित केल्याची घोषणा पडळकरांनी घेतली आहे. तर दुसरीकडे न्यायालयीन लढा सुरुच राहील असे त्यांनी सांगितले

  आता गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात लढा 

  दुसरीकडे सरकारच्या आवाहनानंतरही कर्मचारी संपातून माघार घेण्यास तयार नाहीत. आज एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. हा एसटी कर्मचाऱ्यांचा लढा हा मानवाधिकाराचा लढा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. आता या लढ्याचे नेतृत्व खोत-पडळकरांकडून सदावर्ते यांच्याकडे आल्याचे हे संकेत आहेत.

  सरकार आक्रमक, दोन दिवसांचा अल्टिमेटम 

  सेटी महामंडल प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत, दोन दिवसांत कामावर हजर झाला नाहीत, तर बडतर्फी करु, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. परबांनी काल केलेल्या घोषणेनंतरही आज राज्यभरातील एसटी डेपोत कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  शिवसेनेकडून खोत-पडळकरांच्या भूमिकेचं स्वागत

  खोत-पडळकरांनी आंदोलन मागे घेण्याची आणि आंदोलोनातून बाहेर पडण्याची भूमिका घेतली, त्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. कुठलंही आंदोलन हे कुठे थांबवावे, हे कळायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.