
कोलकातामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 सामना खेळला जात आहे. वर्ल्डकपमधील प्रत्येक सामन्यांमध्ये विक्रमांवर विक्रम रचत चाललेल्या किंग विराट कोहलीने आज बर्थडेला सुद्धा निराश न करता दमदार अर्धशतकी खेळी केली.
कोलकातामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 सामना खेळला जात आहे. वर्ल्डकपमधील प्रत्येक सामन्यांमध्ये विक्रमांवर विक्रम रचत चाललेल्या किंग विराट कोहलीने आज बर्थडेला सुद्धा निराश न करता दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीमुळे टीम इंडियाच्या डावाला आकार आला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहलीने संघाचा डाव सावरला.
विराट कोहली शतकाच्या जवळ आहे. विराट कोहली ८९ धावा करून खेळत आहे. 45 षटकांनंतर भारताची धावसंख्या 278 आहे. सूर्यकुमार यादव १७ धावा करून खेळत आहे.