Kissing On Running Bike Stunt Aurangabad

औरंगाबाद शहरामध्ये मंगळवारपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा तरुण तरुणीचा चालू गाडीवर किसिंग स्टंटचा व्हिडीओ चांगलाच गाजलेला होता. परंतु या तरुणाला चालू गाडीवर किसिंग करणे चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 24 तासाच्या आत जिन्सी पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे(Kissing On Running Bike Stunt Aurangabad).

  सुरज गौतम कांबळे वय 24 असे या आशिकाचे नाव आहे.  व्हिडिओमध्ये धुमाकूळ घालणारा हा तरुण अपेक्स रुग्णालया जवळ आढळून आला असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना त्यांच्या गुप्त बतमीदारामार्फत मिळाली.

  या माहितीच्या आधारे पीएसआय ए.पी. तांगडे यांनी आपल्या पथकासह जाऊन स्टंटमॅन तरुणाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे, हा तरुण शहरातील बीड बायपास परिसरात राहत असून, शहरातील एका कापड दुकानामध्ये काम करतो.

  थर्टीफर्स्टच्या रात्री मित्रांनी त्याला चॅलेंज केले होते की, तू गर्लफ्रेंडला चालू गाडीवर किस करू शकतो का? तरुणाने ते चॅलेंज स्वीकारून सेलिब्रेशन म्हणून चालू गाडीवर किसिंग स्टंट केला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तवणूक करणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे याप्रकारे गुन्हा दाखल केला आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022