कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाची येत्या मे महिन्यापासून सुरूवात : मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

रायगड जिल्ह्यात महाड येथे एनडीआररफचे कायमस्वरूपी पथक तयार करण्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी तर  चक्रीवादळामुळे  रायगड जिल्ह्यात निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सार्वजनिक मालमत्तांच्या दुरुस्तीकरिता निधी देण्याची मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी दुसऱ्या एका प्रश्नाद्वारे केली, या प्रश्नांना वडेट्टीवार यांनी उत्तर दिले.

  मुंबई (MUMBAI) : राज्य सरकारने कोकणासाठी हाती घेतलेला ३२००कोटी रुपयांचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम येत्या मे महिन्यात सुरू होईल आणि येत्या २ ते ३ वर्षात हा कार्यक्रम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीं आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.


   
  महाड येथे एनडीआररफचे कायमस्वरूपी पथक
  रायगड जिल्ह्यात महाड येथे एनडीआररफचे कायमस्वरूपी पथक तयार करण्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी तर  चक्रीवादळामुळे  रायगड जिल्ह्यात निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सार्वजनिक मालमत्तांच्या दुरुस्तीकरिता निधी देण्याची मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी दुसऱ्या एका प्रश्नाद्वारे केली, या प्रश्नांना वडेट्टीवार यांनी उत्तर दिले. कोकणातल्या ८४  टक्के चक्रीवादळ नुकसानग्रस्तांपर्यंत मदत निधी पोहोचला असून उर्वरित निधी लवकरच दिला जाईल असे त्यांनी सांगितले .कोकणात निर्माण होणारी पूरपरिस्थिती रोखण्यासाठी सर्व नदी नाल्यांच्या खोलीकरणाची आवश्यकता असून यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
   
  एसडीआरएफचे ४८ जवानांचे एक पथक महाडमध्ये
  रायगड जिल्ह्यात महाड इथे एनडीआररफचे कायमस्वरूपी पथक तैनात करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला असून तोपर्यंत एसडीआरएफचे ४८ जवानांचे एक पथक महाडमध्ये तैनात करण्यात येईल त्याचप्रमाणे एसडीआरएफची चार नवी पथके तयार  करण्यात येतील असं वडेट्टीवार यांनी सांगितले.