
कोरियन लोकांची त्वचा स्वच्छ असते, जी पूर्णपणे चकचकीत आणि निर्दोष असते. या प्रकारची त्वचा मिळविण्यासाठी, आपण असे बर्फाचे तुकडे बनवू शकता, ज्यामुळे काचेची त्वचा मिळणे सोपे होईल.
कोरियन महिला (Korean Women) त्यांच्या निर्दोष आणि चमकदार त्वचेसाठी ओळखल्या जातात .या महिलांची त्वचा काचेसारखी चमकदार असते. त्यांच्यासारखी नितळ त्वचा असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आजकाल सोशल मिडियावर या कोरियन महिलांचे ब्युटी सिर्केट्स असलेले रिल्स, व्हिडिओ फार चर्चेत आहेत. त्या मुखत्वे तांदळाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात असंही निदर्शनास आलं आहे. सोप्या आणि सहज असलेल्या या स्किन केअर भारतीय महिलांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. जर तुम्हालाही त्यांच्यासारखी काचेसारखी त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठापासून बनवलेले बर्फाचे तुकडे वापरू शकता. तांदळाच्या पिठामुळे त्वचा चांगली स्वच्छ होते आणि ती चमकते. त्याचा वापर कसा करायचा जाणून घ्या
तांदळाचे पाणी बर्फाचे तुकडे बनवण्यासाठी तुम्हाला लागेल…
तांदळाचे पीठ
मध
कोरफड जेल
गुलाब
पाणी
कसे बनवावे
ते बनवण्यासाठी एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्या.नंतर त्यात मध, गुलाबपाणी मिसळा.नीट ढवळून झाल्यावर त्यात थोडे पाणी घालावे.नंतर बर्फाच्या ट्रेमध्ये भरून काही तास फ्रीजरमध्ये ठेवा.तांदूळ पाण्याचा बर्फाचा क्यूब तयार आहे.
कसं वापरायचं?
हे बर्फाचे तुकडे लावण्यासाठी, प्रथम आपला चेहरा पूर्णपणे धुवा.त्यानंतर हा बर्फाचा क्यूब चेहऱ्यावर लावा.नीट लावल्यानंतर बोटांनी चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करा.