धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर दुर्घटना, विजेचा धक्का लागल्याने लाईटमनचा मृत्यू

  मुंबई : एकीकडे मनोरंजन जगातील स्टार मंडळी जल्लोषात गणेशोत्सव साजरा करत आहेत. तर, दुसरीकडे याच मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘इमली’ (Imlie Serial) या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने लाईटमनचा मृत्यू (Labourer Died) झाल्याची बातमी समोर आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव महेंद्र यादव असं आहे. अद्याप मालिकेच्या टीमने किंवा चॅनले यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.

  स्टार्स प्लसवरील ‘इमली’ (Imlie) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण आता या मालिकेच्या सेटवर एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये फिल्मसिटीमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. दरम्यान लाईटमनला विजेचा धक्का लागला. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला.

  ‘इमली’ (Imlie) मालिकेच्या सेटवर मृत्यू झालेल्या लाईटमनचे नाव महेंद्र यादव (Mahendra Yadav) असे आहे. गेल्या काही दिवसांपासून तो या अमालिकेचं शूटिंग करत होता. 28 वर्षीय महेंद्रला काही दिवसांपूर्वीदेखील विजेचा धक्का लागला होता. त्यानंतर 19 सप्टेंबरला त्याला पुन्हा एकदा विजेचा धक्का लागला आणि त्याने निधन झाले.

  लाईटमनच्या निधनाने ‘इमली’ मालिकेच्या शूटिंगला ब्रेक
  महेंद्र यादव (Mahendra Yadav) या लाईटमनच्या निधनाने ‘इमली’ मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. महेंद्रला विजेचा धक्का कुठे आणि कसा लागला हे अद्याप समोर आलेलं नाही. महेंद्र यादव याने ‘इमली’ या मालिकेआधीही अनेक मालिकांसाठी लाईटमन म्हणून काम केलं आहे. ‘इमली’ या मालिकेसह अनेक सिनेमाचं आणि मालिकांचं शूटिंगही फिल्मसिटीमध्ये होतं. 520 एकरमध्ये पसरलेल्या फिल्मसिटीमध्ये जवळपास 16 स्टुडिओ आणि 42 आऊटडोअर शूटिंग लोकेशन्स आहेत.

  ‘इमली’ मालिकेबद्दल जाणून घ्या… (Imlie Serial Details)
  ‘इमली’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. फोर लायन्स फिल्म अंतर्गत गुल खान यांनी ‘इमली’ या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेत अद्रिजा रॉय आणि केतन राव मुख्य भूमिकेत आहे. रोमँटिक नाट्य असणारी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातील पगडंडिया गावातील एका 18 वर्षीय मुलीची गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. आता मालिकेच्या आगामी भागांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या मालिकेतील लव्हस्टोरीचं प्रचंड कौतुक होत आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या पाचमध्ये आहे.