लालूप्रसाद यादवांच्या नव्या सुनेने ख्रिश्चन धर्म सोडून स्वीकारला हिंदू धर्म

खरतंर, लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी हे दोघेही हे या लग्नाबाबत समाधानी नव्हते, अशी माहिती आहे. दोघांचीही या लग्नाला परावनगी नव्हती, असेही सांगण्यात येते आहे. लालू आणि राबडी यांनी यापूर्वी आपल्या स्रव मुलामुलींची लग्ने ही यादव जातीतच केली होती. मात्र इथे तर रिचेल साधी हिंदूही नव्हती. यामुळे संपूर्ण कुटुंबातच या लग्नाला विरोध होता.

    पाटना (Patna) : राष्ट्रीय जनता दलाचे नेते, बिहारचे विरोधी पक्षनेते आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी केलेला विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय आहे. हरियाणात राहणाऱ्या रेचन नावाच्या तरुणीशी त्यांनी विवाह केला आहे. रेचल ख्रिश्चन असल्याने, त्याची सर्वाधिक चर्चा राजकीय वर्तुळातही होती. मात्र आता यात एक नवी माहिती समोर आली आहे.

    माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, आपल्या मैत्रिणीला लग्नासाठी धर्म परिवर्तन करण्यासाठी तेजस्वी यादव यांनी राजी केल्याची माहिती आहे. रेचलनेही प्रेमापोटी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांचे सध्याचे नावही बदलले आहे. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात सामील होण्यापूर्वी त्या रेचलवरुन राजेश्वरी यादव झाल्या आहेत. दरम्यान आत्तापर्यंत याबाबत लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

    खरतंर, लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी हे दोघेही हे या लग्नाबाबत समाधानी नव्हते, अशी माहिती आहे. दोघांचीही या लग्नाला परावनगी नव्हती, असेही सांगण्यात येते आहे. लालू आणि राबडी यांनी यापूर्वी आपल्या स्रव मुलामुलींची लग्ने ही यादव जातीतच केली होती. मात्र इथे तर रिचेल साधी हिंदूही नव्हती. यामुळे संपूर्ण कुटुंबातच या लग्नाला विरोध होता. राजकीय पातळीवरही याचे चुकीचे संदेश जातील अशी भीती राजदचे सुपरिमो लालूंना होती.

    याच सर्व कारणांमुळे लालूंच्या कुटुंबात सहभागी होण्यासाठी, हिंदू धर्म स्वीकारण्याची वेळ रेचलवर आली असल्याचेही सांगण्यात येते आहे. त्यानंतर धर्म बदलल्याने आता रेचल ही राजेश्वरी यादव झाली आहे. राजदच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार, तिच्या धर्मांतरणामुळे लालू आणि राबडी यांची नाराजीही कमी झाल्याही माहिती आहे.

    दोघेही लहानपणापासूनचे मित्र
    गुरुवारी हिंदू पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात दोन्ही कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. मोठ्या राजकीय नेतृत्व असलेल्या या समारंभात मोठ्य् राजकीय नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले नाही. याबाबत बुधवारपर्यंत तेजस्वी यादव यांचे नीकटवर्तीययही काही बोलण्यास तयार नव्हते. केवळ लालू यांची मुलगी रोहिणी हिने सोशल मीडियावर तेजस्वीला शुभेच्छा दिल्या होत्या.

    तेजस्वींच्या लग्नात लालूप्रसाद यादव येण्यास तयार नव्हते, शीही माहिती आहे. खूप मिनतवाऱ्या केल्यानंतर लालू आणि राबडी देवी लग्नात पोहचल्याही माहिती आहे. तेजस्वी आणि रेल हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. गेल्या सात वर्षांपासून त्यांच्यातील मैत्री प्रेमात रुपांतरीत झाली. रेचल ही चंदीगडच्या व्यावसायिकाची कन्या सून, त्यांचे कुटुंब हरियाणातील राहणारे आहे.