लालू यादव आता सिंगापूरला जाऊ शकणार; कोर्टाने दिली परवानगी

लालू यादव अनेक आजारांनी त्रस्त असून त्यांना किडनी, फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग आहे. मधुमेह आणि रक्तदाबाचाही त्रास होत आहे. लालूंच्या दोन्ही किडन्या ७५ टक्क्यांहून अधिक निकामी झाल्या आहेत. यापूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना त्यांचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले होते.

    नवी दिल्ली : आयआरसीटीसी (IRCTC) घोटाळा प्रकरणातील आरोपी तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. लालू यादव यांनी उपचारासाठी (Treatment) सिंगापूरला (Singapore) जाण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

    लालूप्रसाद यादव यांच्या याचिकेवर राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) आज सुनावणी केली. न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना १० ते २५ ऑक्टोबरदरम्यान सिंगापूरला जाण्याची परवानगी दिली आहे. राजदचे (RJD) प्रमुख लालू यादव किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला जाणार आहेत. किडनी प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर लालू कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे.

    लालू यादव अनेक आजारांनी त्रस्त असून त्यांना किडनी, फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग आहे. मधुमेह आणि रक्तदाबाचाही त्रास होत आहे. लालूंच्या दोन्ही किडन्या ७५ टक्क्यांहून अधिक निकामी झाल्या आहेत. यापूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना त्यांचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले होते. लालूंनी १३ सप्टेंबर रोजी कोर्टात अर्ज दाखल करून पासपोर्ट परत करण्याची विनंती केली होती.