Land mafia encroachment on Kandal forest in Kharghar; Dalla on the ground, the cry of green lovers

खारघर रोडपाली येथील २ किमी खाडी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांदळवनांचा नाश आणि जमीन घशात घालण्याचे सत्र सुरू असल्याचे आढळून आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने भराव टाकून सपाटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे उरल्या सुरल्या कांदळवनांवर देखील भूमाफिया उठले असल्याचे दिसून येत असून पर्यवरणाची होत असलेली हानी शहरासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.वनविभागाने वेळीच याला आवर घालावा अशी मागणी करत पर्यवारणवाद्यांनी त्याबाबतची तक्रार मुख्यमंत्री तसेच उच्च न्यायालय नियुक्त कांदळवन समितीकडे केली आहे(Land mafia encroachment on Kandal forest in Kharghar; Dalla on the ground, the cry of green lovers).  

  नवी मुंबई, सिद्धेश प्रधान : खारघर रोडपाली येथील २ किमी खाडी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांदळवनांचा नाश आणि जमीन घशात घालण्याचे सत्र सुरू असल्याचे आढळून आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने भराव टाकून सपाटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे उरल्या सुरल्या कांदळवनांवर देखील भूमाफिया उठले असल्याचे दिसून येत असून पर्यवरणाची होत असलेली हानी शहरासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.वनविभागाने वेळीच याला आवर घालावा अशी मागणी करत पर्यवारणवाद्यांनी त्याबाबतची तक्रार मुख्यमंत्री तसेच उच्च न्यायालय नियुक्त कांदळवन समितीकडे केली आहे(Land mafia encroachment on Kandal forest in Kharghar; Dalla on the ground, the cry of green lovers).

  एकीकडे कांदळवने लवकरात लवकर वन विभागाकडे हस्तांतरीत करावीत असे आदेश नुकतेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे बिनदिक्कत कांदळवनांची कत्तल केली जात आहे. राज्य शासनाच्या वन विभागाने हे नुकसान वाचवावे अन्यथा कांदळवनांचे कधीही भरून न काढता येणारे नुकसान होणार आहे. त्याचा विपरीत परिणाम खारघर, कळंबोली, कामोठेसारख्या शहरांवर होणार आहे.

  नवी मुंबई व खारघर, कामोठे, नवीन पनवेलसारखे भाग हे खाडी बुजवून तयार केले गेले आहेत. कंदळवने ही भरतीच्या पाण्याला रोखण्याचे काम करत असतात. मात्र शहरे तयार करताना कांदळवनांची बेसुमार कत्तल केली गेली असून त्यावर शहरे विकसित केली गेली आहेत. अशात उरलेली कांदळवने देखील उध्वस्त केल्यास भविष्यात भरतीचे पाणी हे शहरांत घुसून नुकसान होणार आहे. खारघर रोडपालीच्या या कांदळवनांच्या या भागात जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर भराव टाकून जमिनी सपाट करण्याचे काम चालवले आहे. याचा परिणाम क्षेत्रातील जैवविविधतेवर होणार आहे.

  पनवेल महापालिकेतील सर्वाधिक स्मार्ट भाग म्हणून खरघरची ओळख आहे. त्यात महापालिकेला सर्वाधिक रेव्हेन्यू मिळवून देणारा भाग म्हणून खारघरला ओळखले जाते. पनवेलमधील इतर भागांपेक्षा खारघर विभागाला जास्त किंमत आहे. त्याचाच भाग म्हणून विकासकांचे खरघरकडे विशेष लक्ष आहे.  मुख्य खारघरमधील भाग विकसित केल्यावर रेल्वे स्थानक ते खाडी किनारी असलेल्या भागात टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळेच की काय एकप्रकारे या भागाला डेब्रिजने ग्रासले आहे. बांधकामाचे डेब्रिज उर्वरित खाडी किनारी आणून टाकले जात आहे. तर नवी मुंबई व पनवेलच्या इतर भागांतून येणारे डेब्रिज देखील इथे टाकले जात अस येथील प्रत्यक्षदर्शीं सांगतात.

  महत्वाची बाब म्हणजे  डेब्रिजने जमिनी व्यापून टाकल्यावर हे डेब्रिज माफिया कांदळवनांकडे सरकत आहेत. त्यामुळे अंधाराचा व निर्मनुष्य वस्तीचा फायदा घेत  थेट डेब्रिज कांदळवनांवर रिते केले जात आहे. त्यामुळे नक्की हे डेब्रिज माफियांचे काम आहे की,जमीन हडपणाऱ्या भु माफियांचे असा प्रश्न पडतो.यावर पनवेल महापालिकेने तोडगा काढणे गरजेचे आहे. सिडकोला देखील याबाबत पालिकेने विचारणा करणे गरजेचे आहे.

  तरंग सरीन यांच्यासारख्या अभ्यासकांनी व संशोधकांनी पक्षी आणि फुलपाखरांच्या अनेक प्रजाती, त्याशिवाय गोल्डन जॅकल ही कोल्हयाची प्रजात या भागात पाहिली आहे.  या सर्व बाबी नमूद करत पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून ही बाबत वन विभागाकडे सुपूर्द करत तातडीने वन सचिवांना  याप्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

  त्यांच्या तक्रारीत नाटकनेक्ट फाऊंडेशन आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठान या पर्यावरणवादी संस्थांचे म्हणणे आहे की; कांदळवनांच्या क्षेत्रात जो भराव टाकण्यात आला, तो एकसमान करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी  कोळंबीची अनधिकृत पैदास करण्यात येत असून त्यावर कोणताही अंकुश नाही.
  हे बेकायदेशीर असून भरतीच्या प्रवाह मार्गात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही,” असे श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार व नाटकनेक्ट फाउंडेशनचे बी एन कुमार यांनी सांगितले. हे क्षेत्र सिडको अंतर्गत येते आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवनांचे जतन करण्याकरिता ते वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात दिरंगाई होत आहे, असेही ते म्हणाले.

  सायन पनवेल कोपरा गावालगत देखील डेब्रिचे ढीग

  सायन पनवेल महमार्गालगत असलेल्या खारघर येथील खाडीकिनारी डेब्रिज रिते केले जात आहे. सध्या खारघर शहराचा विकास हा खाडी किनाऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. पनवेल येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बाजूला अनेक बांधकामे होत आहेत. कांदळवनांचा हा भाग असलेल्या  परिसरात खारघर स्थानकापर्यंत बांधकामे पोहोचलेली आहेत. मात्र या बांधकामांचे निमित्त साधत डेब्रिज माफियांनी या खाडी किनाऱ्याला वेढलेले आहे. अंधाराचा फायदा घेत डेब्रिज थेट कांदळवनांवर टाकले जात आहे. त्यामुळे भविष्यात ही कांदळवने नष्ट करून भूमाफियांकडून जमिनी हडपण्याची शक्यता आह.

  पनवेल पलीकेला राहावे लागणार सतर्क

  नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेपुढे डेब्रिज माफियांचे आव्हान उभे ठाकले आहे. एमआयडीसीला सदैव लक्ष करणाऱ्या  डेब्रिज माफियांनी सध्या खाडी विभागाला लक्ष केल्याचे या निमित्ताने दिसून येत  विरोधी मोहीम हाती घेतल्यावर या माफियांनी पनवेलमधील या खाडी किनाऱ्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. याबाबत पनवेल महापालिकेला आपले खाडी किनारे व मोकळे भूखंड वाचवून शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी लागणार आहे. कंदळवने ही वन विभागाकडे असली तरी; त्या बाजूलाच उंच इमारती आहेत. त्यात सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ची तयारी सुरू आहे. अशात पनवेल पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणासाठी खाडी किनारे व त्या शेजारील मोकळा परिसर डेब्रिजने अस्वच्छ होऊ नये  याची काळजी घ्यावी लागणार आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022