लातूर – टेंभुर्णी मार्ग लवकरच होणार : नितीन गडकरी

    लातूर : लातूर शिक्षणाचा देशभर पॅटर्न निर्माण झाला आहे. तसा रस्त्याच्या बाबतीत व्हावा यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातुरात 2000 कोटीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि उदघाटन कार्यक्रमात सांगितले आहे. तसेचं लातूर – टेंभुर्णी मार्ग लवकरच पूर्ण करु, असा विश्वास गडकरींनी दिला.

    लातूर मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 19 विविध कामांचे, 2000 कोटी रुपयांच्या विकास कामाचे उदघाटन आणि लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमराजे निबाळकर, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार विक्रम काळे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी 2000 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामाचं लोकार्पण आणि उदघाटन केले आहे. राज्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात मेट्रोचे जाळे निर्माण करणार असून त्यामुळे वेळ आणि पैसा वाचणार आहे. उत्तरेतून दक्षिणेत जाणारे रस्ते लातूरला जोडणार असून त्यातून विकासाची गती मिळणार आहे. राज्यात सुरू होणारी मेट्रो ही 8 डब्याची अससून दोन डब्बे शेतमाल तर अन्य डब्यात प्रवासी वाहतूक करणार आहे. यात अनेक खाजगी व्यक्ती पुढे यायला तयार आहेत. असं गडकरी म्हणाले.

    देशातील पहिला जागतिक तंत्रज्ञानाचा पूल बांधण्यात आला आह. यात स्टीलचा वापर केला नाही दोन पिल्लर मधील अंतर 120 फूट ठेवलं आहे. अश्या राष्ट्रीय महामार्गाच काम करताना लगतच्या तलाव तळी यातील मटेरियल रस्त्याच्या बांधकामात वापरला यामुळे पाण्याची स्रोत भक्कमपणे निर्माण झाले आहेत. यामुळे पाण्याची स्वयंपूर्णता आलीय शेतकरी हा आता इंधन उत्पादक झाला पाहिजे. त्याच्या पोराबाळाला काम मिळालं पाहिजे तरच शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.