सीडीएस बिपीन रावतांच्या मार्गदर्शनात सैन्यदलाच्या एकत्र ऑपरेशनपासून स्वदेशी हत्यारांच्या खरेदीपर्यंत अनेक महत्वाचे प्रकल्प, जाणून घ्या….

सैन्यदलातील हत्यारे आधुनिक करणे आणि स्ट्रटजिक पार्टनरशीप मॉडेलबाबत रावत यांच्या देखरेखीखाली काम सुरु होते. या मॉडेलमध्ये सरकारने काही खासगी कंपन्यांना परदेशी हत्यारे निर्माण करणाऱ्या कंपन्यांसोबत, हेलिकॉप्टर, जेट, पाणबुड्या आणि रणगाडे निर्मिती करण्याची योजना तयार केली होती.

  दिल्ली (Delhi) : तामिळनाडूतील हेलॉकॉप्टर दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूने तिन्ही सैन्यदलाचे मोठे नुकसान झाले आहे. तिन्ही सैन्यदलाचे आधुनिकीकरण ते समन्वय अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सध्या बिपीन रावत कार्यरत होते.

  डिसेंबर २०१९ मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा पदभार स्वीकारल्यानंतर, बिपीन रावत गे सैन्यदालत इंटिग्रेटेड थिएटर कमांडपासून आधुनिकीकरण, स्वदेशी यंत्रणा या सगळ्यावर काम करीत होते. सैन्यदलातील प्रकल्पांना होणार विलंब आणि भ्रष्टाचार यावरही त्यांची करडी नजर होती. याबाबत त्यांनी वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली होती.

  इंटिग्रेटेड सिंगल थिएटर कमांड
  सैन्यदलाच्या तिन्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांच्यात योग्य समन्वय असावा यासाठी इंटिग्रेटेड थिएटर कमांड या योजनेवर काम सुरु आहे. याबाबत १ नोव्हेंबरला तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक परा पडली होती.

  थिएटर कमांड ही रचना युद्धाच्या वेळी, तिन्ही सैन्यदलात ताळमेळ राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या कमांडमध्ये युद्धाची रणनीती आणि युद्धाशी संबंधित प्रत्येक निर्णय होणार आहे. सध्या देशात १५ लाख सशक्त सैन्य दल आहे. या सैन्यदलाच्या संघटित आणि एकजूट पद्धतीच्या कामासाठी थिएटर कमांडची गरज होती, सध्या नवे चार थिएटर कमांड निर्मितीसाठी काम सुरु आहे.

  तिन्ही सैन्यदलांकडे असलेल्या १७ कमांडच्या व्यतिरिक्त या ४ कमांडची निर्मिती करण्यात येते आहे. आर्मीकडे तीन थिएटर कमाडं, तर नेव्हीकडे एका कमांडची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तर एअरफोर्सकडे एअर डिफेन्स कमांडची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

  आर्मीच्या आधुनिकीकरणाची योजना
  सैन्यदलातील हत्यारे आधुनिक करणे आणि स्ट्रटजिक पार्टनरशीप मॉडेलबाबत रावत यांच्या देखरेखीखाली काम सुरु होते. या मॉडेलमध्ये सरकारने काही खासगी कंपन्यांना परदेशी हत्यारे निर्माण करणाऱ्या कंपन्यांसोबत, हेलिकॉप्टर, जेट, पाणबुड्या आणि रणगाडे निर्मिती करण्याची योजना तयार केली होती. आपली हत्यारे आधुनिक करणे, गुप्तचर यंत्रणा सक्षण करणे आणि सायबर क्षमतेचा विकास करणे, यावर बिपीन रावत यांचे विशेष लक्ष होते.

  सैन्यदलाच्या प्रोजक्टमधील विलंब आणि भ्रष्टाचारावर नजर
  सैन्यदलांच्या प्रकल्पांच्या विलंबाबाबत आणि भ्रष्टाचाराबाबत रावत हे अत्यंत कठोर होते. याबाबत त्यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांना पत्र लिहून, त्यात त्यांनी विलंब आणि भ्रष्टाचाराबाबत कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले होती. या पत्रानंतर काही कंपन्यांवर कारवाईही करण्यात आली होती.

  रावतांसाठी चीन शत्रू नंबर एक, तर पाकिस्तान दृष्ट राष्ट्र
  काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानपेक्षा चीनकडून देशाच्या सुरक्षेला अधिक धोका असल्याचे रावत यांनी म्हटले होते. तर दहशतवाद्यांना आसरा देणारा पाकिस्तान हे दृष्ट राष्ट्र असल्याची त्यांची भूमिका होती. चीन आणि पाकिस्तान एकत्रितपणे काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही त्यांनी सांगितले होते. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर त्यांच्या कारवायांवर त्यांची करडी नजर होती.