पायातली ‘कोल्हापुरी’ हातातही घ्यायला शिका, न्याय मिळतो; राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांना सल्ला

कोल्हापुरची माणस नुसतेच कोल्हापुरी पायतन घालत नाहीत. तर वेळप्रसंग पडला तर हातात सुध्दा घेतात म्हणून त्यांना न्याय मिळतो. असा असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

    उस्मानाबाद : कोल्हापुरची माणस नुसतेच कोल्हापुरी पायतन घालत नाहीत. तर वेळप्रसंग पडला तर हातात सुध्दा घेतात म्हणून त्यांना न्याय मिळतो. लक्षात ठेवा म्हणून तुम्ही पायत हातात घ्यायला शिका काटा मोडतो म्हणूनच पायात घालायचं नाही. कधी कधी पायतनाचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी सुध्दा करायचा असतो, तो नाही केला तर तुम्हाला आयुष्यात न्याय मिळणार नाही. लढायला शिका, रडत बसू नका, असा असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

    राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले? 

    तुमचे कारखानदार सात आठ महीने ऊसाचे पैसे देत नाही. हे दुर्दैव आहे. कायदा काय सांगतो ऊस तोडणीनंतर १४ दिवसांच्या आत सरकारने जो बांधून दिलेला हमी भाव आहे. त्याप्रमाणे विना कपात एक रक्कमी रक्कम दिली पाहीजे. नाही दिले तर त्याला १५ टक्के व्याजाची आकारणी करुन पैसे शेतकऱ्यांना द्यावे. पण हे कारखानदार वेळेवर पैसे देत नाहीत. तुम्ही गप्प का बसता आवाज उठवा असे आवाहनही शेट्टी यांनी यावेळी केले आहे.

    दरम्यान लोहारा तालुक्यातील माकणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने शुक्रवारी राञी आठ वाजता ऊस व सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.