लीना नायर लंडनमध्ये ग्लोबल सीईओ

मूळच्या कोल्हापूच्या लीना नायर यांची लंडनमधील फ्रेंच लक्झरी समूह शनेलने ग्लोबल सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. त्या आतापर्यंत त्या युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (HR) होत्या.

    कोल्हापूर : मूळच्या कोल्हापूच्या लीना नायर यांची लंडनमधील फ्रेंच लक्झरी समूह शनेलने ग्लोबल सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. त्या आतापर्यंत त्या युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (HR) होत्या.

    लीना नायर यांची ग्लोबल कंझ्युमर गुड कंपनीत जवळपास ३० वर्षांची कारकीर्द राहिली आहे. १९६९ मध्ये जन्मलेल्या लीना नायर २०१३ मध्ये भारतातून लंडनला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना अँग्लो-डच कंपनीच्या लंडन मुख्यालयात नेतृत्व आणि संघटना विकासाच्या जागतिक उपाध्यक्ष बनवण्यात आले. २०१६ मध्ये त्या युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण सीएचआरओ बनल्या आहेत.

    कोल्हापूर लीना नायर यांचे मूळ गाव. त्याचे शालेय शिक्षणही कोल्हापूरच्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले. जमशेदपूरच्या झेवियर्स कॉलेजमधून त्यांना ऑफर आली. तेव्हा जमशेदपूरला शिक्षणासाठी जायचे आहे. तिकडे जाण्यासाठी रेल्वेने पोहोचायला सुमारे ४८ तास लागतात, हे वडिलांना पटवून देण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला, असेही त्यांनी सांगितले.