प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

वडाचीवाडी (ता. वाई) येथील वाघदरा परिसरात सायंकाळी रानात बिबट्याने तीन शेळ्या फस्त केल्या. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून परिसरात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून सध्या वनविभाग बिबट्याचा शोध घेताना दिसत आहे. 

    ओझर्डे : वडाचीवाडी (ता. वाई) येथील वाघदरा परिसरात सायंकाळी रानात बिबट्याने (Leopard Attack) तीन शेळ्या फस्त केल्या. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून परिसरात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून सध्या वनविभाग बिबट्याचा शोध घेताना दिसत आहे.

    गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून या बिबट्याने पूर्व आणि पश्चिम भागातील गावांमध्ये धुमाकूळ घातला आहे. रानात सोडलेल्या शेळ्या रात्री उशिरापर्यंत घराकडे परत आल्या नाहीत. रात्र झाल्याने मालक वसंत शंकर मांढरे यांनी सकाळी उठल्यावर ग्रामस्थांच्या मदतीने वसंत मांढरे यांनी शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी झुडपात एक शेळी मृत अवस्थेत सापडली व शिवारात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले.

    याबाबत वाई वन विभागाचे वनपाल सुरेश पटकारे, वनरक्षक वैभव शिंदे, जांभळीचे वनरक्षक संदीप पवार यांना कळविण्यात आले. पण बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने कुठलेही ठोस पाऊल ऊचलले नसल्याने या बिबट्याचा सध्या गावोगावी शेळ्या फस्त करत बिनधास्तपणाने मुक्त संचार सुरू आहे. त्यासाठी वाईच्या वनविभागाला सक्षम अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अभेपुरी, गाढवेवाडी, पाचपुतेवाडी या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन शेळ्या बेपत्ता आहेत.