यवतमाळमधील नवदाम्पत्याला पंतप्रधानांनी लिहिले पत्र; कारण जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. त्याचे झाले असे की, एडवोकेट राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पाठवले होते.

    यवतमाळ (Yavatmal) : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. त्याचे झाले असे की, एडवोकेट राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पाठवले होते. ढोरे यांनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आशीर्वाददेखील दिले आहेत.

    ढोरे यांच्या पत्राला उत्तर देताना मोदींनी ढोरे कुटुंबाचे निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त केले आणि वधू-वरांना शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले आहेत. ढोरे कुटुंबियांना हे पत्र २२ डिसेंबर रोजी मिळाले असून तेव्हापासून त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून ढोरे कुटुंबाला शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

    एका छोट्याश्या गावातील एका तरुणाने आपल्या लग्नाची पत्रिका देशाच्या सर्वोच व्यक्तीला पाठवली आणि त्यांनी प्रतिसाद दिल्याने गावामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठविल्याने ढोरे परिवारातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.