साडेपाच लाख रुपयांची दारू नष्ट; आजरा पोलिसांची कारवाई

आजरा पोलिसांनी बेकायदेशीररित्या विक्री केली जाणारी तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेली सुमारे साडेपाच लाख रुपयांची दारू शुक्रवारी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आली. 

    आजरा : आजरा पोलिसांनी बेकायदेशीररित्या विक्री केली जाणारी तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेली सुमारे साडेपाच लाख रुपयांची दारू शुक्रवारी उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आली.
    आजरा पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत विविध ठिकाणी कारवाई करत दारू जप्त केली होती. यामध्ये गोवा बनावटीसह हातभट्टीच्या दारूचा समावेश होता. या जप्त दारुमुळे पोलीस स्टेशनच्या दोन खोल्या अडून होत्या. दारू सांभाळणे पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरले होते.
    अखेर आज गांधीनगर गायरान येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, युवराज जाधव उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक शिंदे, नगरपंचायतीचे कर्मचारी, महसूल विभागाचे शासकीय पंच यांच्या उपस्थितीत  सदर दारू नष्ट करण्यात आली.