एका आठवड्यापर्यंत राहतात पिझ्झा – बर्गरच्या स्मृती

    फाष्टफूडची नशा शिगरेट – दारुपेक्षा कमी घातक नाही, ही बाब अनेक अभ्यासातून सिद्ध झाली आहे. ताज्या संशोधनानुसार असे समोर आले आहे की, सिगरेट व दारुपासून दूर सोडल्यानंतर ज्या भावना निर्माण होतात, त्याच भावना एक आठवडा पिझ्झा – बर्गर पासून दूर राहिल्यास निर्माण होतात. यामुळे माणसाला डोकेदुखी बेचैनी चीडचीड, औदासिन्स, सुस्ती व राहून राहून फास्टफूड ची जबरदस्त तरी येणाच्या तक्रारी चा सामना करावा लागतो.

    जितके जास्त व्यसन, तेवढी जास्त बेचैनी

    यातील मुख्य संशोधक एरिका शुल्त यांच्यानुसार, फास्टफूड सोडल्यानंतर होणाऱ्या समस्या व त्यांच्या व्यसनाच्या प्रमाणावर अवलंबून असतात. जर एखादी व्यक्ती दररोज पिझ्झा – बर्गर, चिप्स – न्यूडल्स खात असेल तर, पिझ्झा- बर्गर खाल्ल्यानंतर सहा ते बारा तासांच्या आत त्यांना सुस्ती, बेचैनी, चीडचीड अशा समस्या निर्माण होऊ शकतात. दुसऱ्या – तिसऱ्या दिवशी फास्टफूड खाणार्यांमध्ये ही लक्षणे ३० ते ३६ तासांनंतर उत्पन्न होतात.

    दोन ते पाच दिवसात जास्त चीडचीड

    अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या अभ्यासात २३१ सदस्य सहभागी झाले होते. या सदस्याचे वय १९ ते ६८ च्या दरम्यान होते. संशोधकांनी सर्व सदस्यांना सलग एक महिन्यापर्यंत फास्टफूड पासून दूर राहण्याचे व त्याचे कमी सेवन करण्याचे आदेश दिले होते. दर दिवशीचे त्याचे अनुभव व भावना डायरीत नोंदविण्यास देखील सांगितले. या दरम्यान ९८ टक्के सदस्यांना औदासीन्स, सुस्ती, बेचैनी व फास्टफूड खाण्याची तीव्र इच्छा झाली. दोन ते पाच दिवसामध्ये या भावना सर्वात अधिक होत्या. सातव्या दिवसानंतर यात कमालीची घट व्हायला लागली.