Lizard pieces found in nutritious food porridge; Poisoning of 40 students

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील पेठसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत पालीचे तुकडे आढळून आले. ही खिचडी खाल्ल्यामुळे तब्बल ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली(Lizard pieces found in nutritious food porridge; Poisoning of 40 students).

    उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील पेठसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत पालीचे तुकडे आढळून आले. ही खिचडी खाल्ल्यामुळे तब्बल ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली(Lizard pieces found in nutritious food porridge; Poisoning of 40 students).

    मुलांनी शाळेतील खिचडी डब्यात भरून घरी नेली होती. तेव्हा एका मुलाच्या डब्यात पालीचे मुंडके तर एकाच्या डब्यात पालीच्या शरीराचा मागील भाग आढळून आला. पालकांनी तत्काळ शाळेत येऊन शिक्षकांना या प्रकाराबाबत माहिती दिली. मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप झाले होते. अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन त्रास सुरु झाला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून पालक, शिक्षक आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन उपाययोजना केल्याने मोठं संकट टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

    जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ही खिचडी खाल्ल्यामुळे उलटी, मळमळ, डोके दुखणे, चक्कर येणे असा त्रास सुरप झाला. काही पालकांनी शाळेत धाव घेत या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना नांगरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

    १८ विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेतून उमरगा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. तर काहींना सौम्य त्रास होत असल्याने नाईचाकुर येथील डॉक्टरांची टीम बोलावून शाळेतील एका रुमममध्ये विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. जवळपास २४८ जणांना या खिचडीचे वाटप करण्यात आले होते. मात्र खिचडीची मर्यादा जास्त असल्याने पालीचे विष जास्त पसरले नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

    दरम्यान, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाला भेट दिली. विद्यार्थ्यांची चौकशी करून डॉक्टर आणि शाळा प्रशासनाला योग्य ती देखभाल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थी तसेच पालकांची विचारपूस केली. अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये, यासाठी शाळा प्रशासनाने पावले उचलली असल्याचे शिक्षकांनी सांगितले. तसेच इतर शाळांमध्येही अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून पत्र पाठवण्यात आल्याचे शिक्षकांच्या वतीने सांगण्यात आले.