दारूविक्रीवर कारवाई
दारूविक्रीवर कारवाई

मावळातील लोणावळा परिसरात असलेल्या कार्ला ओढे, वेहरगाव या ठिकाणी विनापरवाना देशी, विदेशी दारू विक्री होत असल्याचे समोर आले. त्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. यामध्ये ११ हजार ९५ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

  वडगाव मावळ : मावळातील लोणावळा परिसरात असलेल्या कार्ला ओढे, वेहरगाव या ठिकाणी विनापरवाना देशी, विदेशी दारू विक्री होत असल्याचे समोर आले. त्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून (Lonavla Rural Police) छापा टाकण्यात आला. यामध्ये ११ हजार ९५ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

  ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्या हेतू लोणावळा ग्रामीण पोलीसांच्या वतीने ‘स्पेशल ड्राइव्ह’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत तीन अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली.

  पोलिसांनी केलेल्या कारवाईत

  नंदू पांडुरंग हुलावळे, संतोष चिंधु शिळावणे व वैभव पांडुरंग चव्हाण या तिघांविरुद्ध अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच तिन्ही आरोपीं विरुद्ध लवकरच न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहाय्यक फौजदार बोकड, पोलीस हवालदार शकील शेख, अमित ठोसर, पोलीस नाईक गणेश होळकर, शरद जाधवर, भूषण कदम, किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद गवळी, सिद्धेश्वर शिंदे, रहीस मुलाणी, अरुण पवार यांनी केली आहे.

  अशाप्रकारे अवैध धंदे सुरु असल्यास लोणावळा ग्रामीण दूरध्वणी क्र. ०२११४२७३०३६ यावर संपर्क करून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे.