प्रभू येशूने जगाला शांततेचा संदेश दिला : राजेंद्र पाटील यड्रावकर

प्रभू येशूने संपुर्ण जगाला शांततेचा संदेश दिला आहे. तसेच प्रभू येशुने प्रेम, सत्य, त्याग व जगण्याचा मार्गही मानवाला सांगितला आहे. जगात प्रभू येशुने सांगितलेल्या वचनाचा आदर करीत जगभरातील मानवाची वाटचाल सुरु आहे.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : प्रभू येशूने संपुर्ण जगाला शांततेचा संदेश दिला आहे. तसेच प्रभू येशुने प्रेम, सत्य, त्याग व जगण्याचा मार्गही मानवाला सांगितला आहे. जगात प्रभू येशुने सांगितलेल्या वचनाचा आदर करीत जगभरातील मानवाची वाटचाल सुरु आहे. यापुढील काळातही प्रभू येशूने सांगितलेल्या संदेश व वचनाचा प्रत्येकांनी आपल्या जीवनात अवलंब करावा. तसेच नवा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकांने उपाययोजना कराव्यात तरच पुन्हा हेही संकट प्रभू येशूच्या माध्यातून नक्कीच टळेल, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

    जयसिंगपूर-संभाजीपूर (ता.शिरोळ) येथील बिलिवर्स इस्टर्न चर्च येथे नाताळ साजरा करण्यात आला. यावेळी यड्रावकर यांनी ख्रिस्ती बांधवाना शुभेच्छा देवून नाताळ कार्यक्रमात बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक उदय ठोमके यांनी केले.

    त्यानंतर चर्चचे फादर महेश आवळेकर म्हणाले, प्रभू येशूच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगभरात नाताळ सण साजारा केला जातो. प्रभू येशूनी पुर्ण जगाच्या तारासाठी सर्व दुःख आपण सोसले आणि मानवाला जीवन जगणे शिकवले आहे. बायबलमध्ये दिलेल्या प्रत्येक वचनाचे पालन प्रत्येक नागरीकांनी करणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाचे येणारे नवीन संंकट टाळण्यासाठी प्रत्येकांनी प्रार्थना करावी, हेही संकट प्रभू नक्कीच दुर करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    यावेळी पास्टर अनिल आवळे, संजय नांदणे, सुभाष मुरगुंडे, महेश तिवडे, माणिक दळवी, बाबासो आवळेकर, सुहास उदगांवे, हानल तिवडे, सदाशिव चव्हाण, मोहन कांबळे, देविड तिवडे, पा.दिपाली आवळे यांच्यासह महिला मोठया संख्येने उपस्थित होते.