Loudspeaker gift to the mosque from Hindu brothers; Darshan of unity in Buldana district

देशभरासह महाराष्ट्रात मंगळवारी 'रमजान ईद' साजरी केली. महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापलं असतानाच, बुलडाणा जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याचे एक अनोखं दर्शन घडले आहे. बुलडाणा तालुक्यातील केळवद गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊड स्पीकर म्हणजेच भोंगा भेट दिला आहे(Loudspeaker gift to the mosque from Hindu brothers; Darshan of unity in Buldana district).

    बुलडाणा : देशभरासह महाराष्ट्रात मंगळवारी ‘रमजान ईद’ साजरी केली. महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापलं असतानाच, बुलडाणा जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याचे एक अनोखं दर्शन घडले आहे. बुलडाणा तालुक्यातील केळवद गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊड स्पीकर म्हणजेच भोंगा भेट दिला आहे(Loudspeaker gift to the mosque from Hindu brothers; Darshan of unity in Buldana district).

    राज ठाकरे यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध

    एकीकडे राज्यात भोग्यांवरून राजकारण तापले असताना सामाजिक सलोखा जपत केळवद गावातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील मशिदीला भोंगा भेट देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध केला. अवघ्या ५ हजार लोकसंख्या असलेल्या केळवद गावात मुस्लिमांची फक्त ३ टक्के संख्या आहे. गावात एक मशीद असून या मशिदीवर अजूनही भोंगा नव्हता, हीच बाब लक्षात घेता गावातील हिंदू बांधवांनी एकत्र येत गावातील मशिदीला भोंगा भेट दिला. यावेळी गावातील सरपंचासह असंख्य गावकऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला.

    ‘राज्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न’

    या देशात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी तसेच महागाईसारखे असंख्य मुद्दे आहेत. त्यावर प्रकाश टाकण्याऐवजी राज ठाकरे हनुमान चालीसाच्या नावाखाली बहुजनांचे माथे भडकवत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. इतकेच नाही तर, राज ठाकरे सुपारी घेऊन राज्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न करताहेत असा आरोपही केळवदच्या ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.