कोल वॉशरीमध्ये वेस्टकोलच्या नावावर महाजनकोचा 5950 कोटींचा घोटाळा, राष्ट्रवादीची सीबीआयकडे तक्रार

  नागपूर (Nagpur) : महाराष्ट्रात कोळसा टेंडर घोटाळा (Coal tender scam) होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्टात आला आहे. हा घोटाळा तब्बल 5950 कोटींचा असल्याचं म्हणत राष्ट्रवादीने सीबीआयकडे तक्रार (NCP file complaint to CBI) केली आहे. तुमच्या घरामध्ये जी वीज येथे ती औष्णिक विद्युत केंद्रात कोळशापासून तयार होते. तुमच्या विजेच्या बिलात कोळशा खरेदी आणि स्वच्छता प्रक्रियासह संपूर्ण खर्च विजेच्या बिलात जोडून येतो. त्यामुळे कोळशा स्वच्छता प्रक्रियेत जर काही घोटाळा होत असेल तर तो थेट तुमच्या खिशावर डल्ला मारला जातो.

  वीज निर्मितीसाठी महाजनको हा कोळसा WCL, MCL व ACCL या संस्थांकडून खरेदी करते. कोळसा जमिनीतून निघतं असल्याने औष्णिक विद्युत केंद्रात वारण्याआधी तो पाण्याने स्वच्छ केला जातो. स्वच्छता प्रक्रियेत कोळशामध्ये मिश्रित असलेले इतर निरुपयोगी टाकाऊ घटक निघून जाते. या प्रक्रियेत 15 ते 20 टक्के घट ग्राहय धरली जाते. वीज निर्मितीसाठी महाजनकोला हा कोळसा स्वच्छ करून देण्याची जबाबदारी खनिकर्म महामंडळाची आहे. खनिकर्म महामंडळ निविदा काढून खाजगी कंपन्यांकडून हा कोळसा धऊन घेता. इथपर्यंत सर्व ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की हा घोटाळा कुठे आहे? तर हा घोटाळा दडला आहे वेस्ट कोलमध्ये.

  कोळसा स्वच्छ करणाऱ्या कंपन्यांना 15 ते 20 टक्के निघणार वेस्ट कोल हा महाजनको खनिकर्म महामंडळाच्या माध्यमातून कोळसा स्वच्छ करणाऱ्या कंपन्यांना ग्रेड नुसार 300 रुपये ते 600 रुपये प्रति मॅट्रिक टन दराने विकून टाकते. आज खुल्या बाजारात कोळशाची किंमत सहा हजार रुपये मॅट्रिक टन आहे. त्यामुळे वेस्ट कोल खुल्या बाजारात तीन हजार मॅट्रिक टनच्या वर विकला जातो. या फरकात हा भ्रष्ट्राचार दडला आहे. राज्यात दरवर्षी 22 मिलियन मॅट्रिक टन MMTकोळसा हा वीजनिर्मिती आधी धुतला जातो. त्यापैकी 15 टक्के वेस्ट कोल पकडला तरी 3.30 मिलियन मेट्रिक टन MMT का वेस्ट कोल म्हणून कोल वॉशरी कंपन्या ओपन मार्केट बाजार दरामध्ये विकतात. त्यामुळे या भ्रष्ट्राचाराची सीबीआयकडे तक्रार करण्यात आली असून महाविकास आघाडीमधील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने ही तक्रार केली आहे.

  जो वेस्ट कोल महाजनको व खनिकर्म महामंडळ 300 रुपये व 600 रुपये मेट्रिक टन या दराने कोल वॉशरी मालकांना देतात, तोच कोल ओपन मार्केटमध्ये 3000 रुपये मॅट्रिक टन ने विकला जातो. त्यामुळे हिंद एनर्जी व एसीबी या कोल वॉशरी पाच वर्षाला 4670 हजार कोटींची अतिरिक्त नफा मिळवून दिला जातो असा तक्रारीत आरोप करण्यात आला.

  महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या संसदीय समितीने वेस्ट कोल हँडलिंग संदर्भात मे 2021 एक धोरण ठरवले. त्यानुसार स्वच्छता प्रक्रियेत वॉशरीतून निघणार वेस्ट कोल प्रथम प्राधान्य वीज निर्मिती साठी वापरायचा आहे. दुसरे प्राधान्य वेस्ट कोल रस्ते, धरण व इतर बांधकामासाठी वापरायला सांगितले. त्यामुळे शासनाच्याच खर्चात बचत होते. मात्र महानको खनिकर्म महामंडळच्या माध्यमातून कोल वॉशरी मालकांना नाममात्र दरात विकत आहे. हे केंद्र सरकारच्या वेस्ट कोल धोरणाचे सरासर उल्लंघन आहे.

  यावर महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ व महाजनको अधिकाऱ्यांना विचारले असता ते बोलायला तयार नाही. ग्राहक म्हणून हा भ्रष्ट्राचार खनिकर्म महामंडळ व महाजनको पुरता मर्यादित नाही विजेचा वापर करणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी याचा संबंध येतो. ज्यात थेट तुमच्या खिशावर दिवसरात्र डल्ला मारला जात आहे.