सुनील तटकरे विरुद्ध सुनील तटकरी ! रायगडच्या निवडणूकीमध्ये येणार रंगत

महायुतीकडून सुनील तटकरे यांचा जोरदार प्रचार केला जात आहे. रायगडमध्ये आता सुनील तटकरी या नावाच्या व्यक्तीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

    रायगड – देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीचेस वारे वाहत आहेत. आज पहिल्या टप्प्यातील मतदान देखील पार पडत आहे. दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूकीमध्ये रंगत येत आहे. रायगडमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून सुनील तटकरे यांचा जोरदार प्रचार केला जात आहे. रायगडमध्ये आता सुनील तटकरी या नावाच्या व्यक्तीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रायगडच्या लोकसभा निवडणूकीमध्ये नवीन ट्वीस्ट आला आहे.

    रायगड लोकसभा निवडणूकीसाठी सुनील दत्ताराम तटकरी नावाच्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी रायगड लोकसभेसाठी महायुतीकडून सुनील तटकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे रायगडमध्ये आता मतदारांसमोर संभ्रम निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. सुनील तटकरे यांच्या नावाशी मिळते जुळते नाव असलेला उमेदवार मैदानामध्ये उतरल्यामुळे अजित पवार गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अशा पद्धतीचे राजकारण अनंत गीते यांच्यासोबत देखील करण्याचा प्रयत्न केला गेलाआहे.

    महाविकास आघाडीकड़ून अनंत गीते यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी दोन अनंत गीते नावाच्या व्यक्तींनी यापूर्वीच अर्ज भरलेला आहे. त्यानंतर आता सुनील तटकरे यांच्या नावाशी साम्य असलेले सुनील तटकरी यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे. मतदारांना चकवा देण्यासाठी आणि उमेदवारी मते विभागली जाण्यासाठी ही राजकीय खेळी खेळली जात आहे. त्यामुळे रायगडमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते या दोघांच्या नावांशी साम्य असलेले उमेदवार रायगडच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. यामुळे रायगड लोकसभा निवडणूकीची रंगत आणखी वाढणार आहे.