माझी वसुंधरा अभियानाचे जिल्हाभरात जनजागरण करणार : दिलीप स्वामी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या संपूर्ण देशभरात साजरा केला जातो आहे. या अमृत महोत्सव अंतर्गत माझी वसुंधरा अभियान राबवले जात आहे. या अभियानाच्या जिल्हाभरात जनजागृतीसाठी त्याचप्रमाणे गावकऱ्यांचा या अभियानात सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चित्ररथ तयार करण्यात आला आहे.

    सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या संपूर्ण देशभरात साजरा केला जातो आहे. या अमृत महोत्सव अंतर्गत माझी वसुंधरा अभियान राबवले जात आहे. या अभियानाच्या जिल्हाभरात जनजागृतीसाठी त्याचप्रमाणे गावकऱ्यांचा या अभियानात सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चित्ररथ तयार करण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या माध्यमातून तयार केलेल्या चित्ररथाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांच्या हस्ते करण्यात आले.

    प्रातिनिधिक स्वरूपात दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या चित्ररथाचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. लवकरच उर्वरित दहा पंचायत समितींचे चित्ररथ तयार होतील व माझी वसुंधरा अभियानाचे जिल्हाभरात व्यापकपणे जनजागरण केले जाईल, असे यावेळी सीईओ स्वामी यांनी सांगितले.

    यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, कार्यकारी अभियंता बांधकाम 2, सुनील कटकधोंड, शाखा अभियंता रमेश चौगुले आदी उपस्थित होते.

    प्रास्ताविक दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, आभार कृषी विभागाचे अधीक्षक उमाकांत कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन चव्हाण, कैलास जिंद्दे , निशिकांत लोंढे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामपंचायत, कृषी विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

    पंचायत समिती दक्षिण सोलापूरमार्फत स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवाचे कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टिकरचे अनावरण दिलीप स्वामी व मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.