म्हाडा पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; भाजपच्या ‘या’ नेत्याला अटक

अरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी धडक कारवाईस सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाचा पाटोदा येथील माजी अध्यक्ष संजय सानप यास अटक करण्यात आली आहे. 

    पुणे : म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणात इतर परिक्षांमधील गोंधळही समोर आले आहेत. आरोग्य विभागातील पेपर फुटी प्रकरणाने एकच खळबळ माजली होती. आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे.

    दरम्यान अशातच पुणे पोलिसांनी या प्रकरणात एका भाजप नेत्याला ताब्यात घेतले आहे. या अरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी धडक कारवाईस सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाचा पाटोदा येथील माजी अध्यक्ष संजय सानप यास अटक करण्यात आली आहे.

    पुणे पोलीस सानप याची चौकशी करत होते. या प्रकरणात सानपचा समावेश आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर अजून कोण कोण यामध्ये सहभागी आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

    दरम्यान पेपरफुटी प्रकरणावरून सुरु झालेल्या या तपासात अनेक घोटाळे समोर आले आहेत. असे अनेक घोटाळे समोर येऊ शकतात. ही तर सुरुवात आहे,” असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.

    आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याचा तपास सुरु केला. या तपासात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.