suryanamskar

 मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2022) निमित्ताने सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १ कोटीपेक्षा (1 Crore People To Do Suryanamskar On Makar Sankranti) जास्त लोक योगासन करताना दिसतील, अशी आशा आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली आहे.

    मकर संक्रांती (Makar Sankranti 2022) १४ जानेवारी रोजी आहे. या निमित्ताने एका सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १ कोटींपेक्षा (1 Crore People To Do Suryanamskar On Makar Sankranti) जास्त लोक योगासन करताना दिसतील, अशी आशा आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ उत्सवांतर्गत १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी होणाऱ्या जागतिक सूर्यनमस्कार कार्यक्रमासाठी आयुष मंत्रालयाने सर्व तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

    “हे सिद्ध सत्य आहे की सूर्यनमस्कारामुळे चैतन्य आणि प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि त्यामुळे कोरोनाला दूर ठेवता येते. आम्ही या कार्यक्रमात ७५ लाख लोक सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, परंतु नोंदणी आणि आमची तयारी पाहता, हा आकडा १ कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आयुष मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू केला आहे,” असं सोनोवाल यांनी सांगितलं.

    भारतीय योग संघटना, राष्ट्रीय योग क्रीडा महासंघ, योग प्रमाणन मंडळ, एफआयटी इंडिया यासारख्या भारतातील आणि परदेशातील आघाडीच्या योग संस्थांनी, इतर सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांनी या जागतिक कार्यक्रमात भाग घेणे अपेक्षित आहे. या व्हर्चुअल बैठकीत आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई म्हणाले की, “सूर्यनमस्कार मन आणि शरीराला नवसंजीवनी देतो.”

    दरम्यान, सहभागी आणि योग उत्साही लोक संबंधित पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात आणि त्यांना १४ जानेवारी रोजी सूर्यनमस्कार करतानाचे व्हिडिओ अपलोड करावे लागतील. नोंदणी लिंक संबंधित वेबसाइटवर उपलब्ध आहेत आणि आयुष मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणावर वितरित केल्या जातात.