घरीच बनवा ‘हा’ सोपा नारळाचा पदार्थ, चविष्टही आणि हेल्थीही

  नारळात (Coconut) असे अनेक पोषक तत्व असतात जे आपली प्रतिकारशक्ती वाढवतात. याच्या सेवनाने सांधेदुखी आणि ऑस्टियोपोरोसिसची समस्या दूर होण्यास मदत होते. म्हणजेच याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. याशिवाय कोरडे खोबरे शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर करते.

  साहित्य

  • २ कप मैदा
  • २ चमचे नारळ पावडर
  • १/४ टीस्पून वेलची पावडर
  • साखर चवीनुसार
  • २ चमचे तूप
  • आवश्यकतेनुसार तेल

  नारळ पुरी कशी बनवायची:

  • सर्व प्रथम एका भांड्यात मैदा, वेलची पूड, नारळ आणि तूप एकत्र करून घ्या.
  • एका भांड्यात साखर आणि पाणी घालून द्रावण तयार करा.
  • नंतर या मिश्रणातून कडक पीठ मळून घ्या.
  • पिठावर थोडेसे तेल लावा आणि सुमारे 15 मिनिटे बाजूला ठेवा.
  • दरम्यान, कढईत तेल मध्यम आचेवर ठेवून गरम करण्यासाठी ठेवावे.
  • ठरलेल्या वेळेनंतर पिठाचे गोळे करून घ्या.
  • एका गोळ्यावर थोडेसे तेल लावा आणि ते पूर्ण लाटून घ्या.
  • त्याचप्रमाणे सर्व पोळी लाटून प्लेटमध्ये ठेवा.
  • तेल गरम झाल्यावर सर्व पुऱ्या एक एक करून तळून घ्या.
  • नारळ पुरी तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.