कमीत कमी साहित्यात घरी बनवा टेस्टी सीताफळ आईस्क्रीम

  साहित्य :

  • 4 कप सिताफळाचा गर
  • एक कप फ्रेश क्रिम
  • दीड कप दूध पावडर
  • अर्धा कप साखर
  • वेनिला इसेंस
  • अडिच कप दूध

  कृती :

  सर्वात आधी एका पॅनमध्ये दूध उकळवत ठेवा आणि ते आटवून घ्या. त्यानंतर ते थंड करण्यासाठी बाजूला ठेऊन द्या. दूध थंड झाल्यानंतर त्यामध्ये साखर, दूधाची पावडर, वेनिला इसेंस, क्रिम टाका आणि मिश्रण एकत्र करून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये सिताफळाचा गर मिक्स करा. तयार मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून फ्रिजरमध्ये ठेवा. 1 तासानंतर फ्रिजमधून बाहेर काढा. व्यवस्थित फेटून घ्या आणि त्यामध्ये क्रिम मिक्स करा. त्यानंतर तयार मिश्रण आईस्क्रीम कंटेनरमध्ये टाकून फ्रिजरमध्ये 40 ते 45 मिनिटांसाठी फ्रिजरमध्ये ठेवा. आहे प्रकारे मस्त थंडगार सिताफळ आईस्क्रीम तयार आहे.