सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांनी केली. 

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची प्रतीक्षा संपली असून, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांनी केली.

    तर यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. तर यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष उपाध्यक्ष यांना सोबत घेत मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांना आपल्या बाजूला बसवत अधिकृत घोषणा केली. याबाबत पत्रकारांशी बोलण्यास यावेळी त्यांनी नकार दिला