धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक; आंदोलकांनी रस्त्यांवर जाळले टायर

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ धाराशिवमधील मराठा समाज आक्रमक झाला असून जोरदार आंदोलन करत आहेत.

    धाराशिव : धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. धाराशिवमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ धाराशिवमधील मराठा समाज आक्रमक झाला असून जोरदार आंदोलन करत आहेत. तसेच आंदोलनावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले आहेत.

     कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर टायरांची जाळपोळ 

    काल राज्यभरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, धाराशिवमध्ये छत्रपती संभाजी राजांची जयंती साजरी करताना गोंधळ निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी उपस्थितांवर लाठीचार्ज केला. संभाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कार्यालयासमोरील रस्त्यावर टायर जाळले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी केल्यानंतर मराठा समाजानंतर निवेदन देण्यात आले.

    कारवाई न केल्यास बेमुदत धाराशिव बंद

    पोलिसांनी केलेल्य लाठीचार्जच्या विरोधामध्ये मराठा समाज धाराशिवमध्ये एकवटला. पोलिस अधिक्षकांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तसेच लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर रविवारपर्यंत कारवाई न केल्यास मराठा समाजाकडून सोमवारपासून बेमुदत धाराशिव बंदचा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस, प्रशास आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबधितावर लवकरात लवकर कारवाई करावी. उत्सवावेळी डिजेच्या रेडीएटरवर मारुन फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रशास आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबधितावर लवकरात लवकर कारवाई करावी. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर रविवारपर्यंत कारवाई न केल्यास मराठा समाजाकडून सोमवारपासून बेमुदत धाराशिव बंदचा इशारा दिला आहे.