‘सोमनाथच्या मंदिरातून मुली होत होत्या बेपत्ता, म्हणून मोहम्मद गझनवीने..’, मौलाना रशिदीनं पुन्हा ओकलं विष. काय आहे खरा इतिहास ?

मंदीरामध्ये गैरप्रकार होत असल्याच समजल्यानंतरही ते मंदिरावर चढले नाहीत, मंदिर फोडण्याचे काम त्यांनी केले नाही. तिथे घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी संपवण्याचे काम त्यांनी केले.

  अहमदाबाद : ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे (All India Imam Association) अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी (Maulana Sajid Rashidi) हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान तर केलेच पण आता हिंदू मंदिराबद्दल अस काही बोलले आहेत की यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी मेहबूब गझनवी (mahmood ghazanavi)) यांच समर्थन केलं असून सोमनाथ मंदिराबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. सोमनाथ मंदिरात (Somnath Temple) चुकीच्या गोष्टी घडत होत्या तसेच तिथे मुली तिथे बेपत्ता होत होत्या, असं मौलाना साजिद रशिदी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महमूद गझनवी (mahmood ghazanavi) सोमनाथ मंदिर तोडले नसून तिथे सुरू असलेल्या गैरप्रकारांना संपवलं असं ते म्हणाले.

  नेमकं काय म्हणाले मौलाना साजिद रशिदी?

  मौलाना साजिद रशिदी म्हणाले की,  ‘लोक महमूद गझनवीला वाईट म्हणतात. गझनवीने सोमनाथ मंदिर उध्वस्त केल्याचे सांगितले जाते. मात्र, तर इतिहास असा आहे की तिथल्या लोकांनी श्रद्धेच्या नावाखाली मंदिरात काय चालते ते उघडकीस आणले होते. देव-देवतांच्या नावाने काय चालले आहे?’ गझनवीने गैरकृत्यांची माहिती देऊन गुप्तहेर मंदिरात पाठवले होते.

  ‘गझनवीने मंदिरातील गैरप्रकार संपवले’

   साजिद  रशिदी म्हणाले , की, ‘सोमनाथ मंदिरात मुलींना कसे बेपत्ता केले जाते, हे गजनवीला लोकांनी सांगितले. त्यानंतरही गझनवीने गुप्तहेर पाठवून तेथे पाहणी केली आणि हे खरोखरच घडत असल्याचे समजल्यानंतरही ते मंदिरावर चढले नाहीत, मंदिर फोडण्याचे काम त्यांनी केले नाही. तिथे घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी संपवण्याचे काम त्यांनी केले.

  कोण आहे महमूद गझनवी?

  गझनवीचा महमूद हा मध्य अफगाणिस्तानात असलेल्या गझनवी राजवंशाचा एक महत्त्वाचा शासक होता, जो पूर्व इराणच्या भूमीत साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी ओळखला जात होता. तो हा यामिनी घराण्याचा तुर्की सरदार गझनीचा शासक सुबक्तगिनचा मुलगा होता. त्यांचा जन्म इ.स. 971 मध्ये झाला, वयाच्या 27 व्या वर्षी 998 मध्ये तो सरकारचे प्रमुख झाला. महमूद लहानपणापासून भारताच्या अफाट समृद्धी आणि संपत्तीबद्दल ऐकत होता. महमूद भारताची संपत्ती लुटून श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत असे. त्याने भारतावर 17 वेळा आक्रमण केले आणि येथील अफाट संपत्ती लुटून गझनीला नेली. 1001 पासून आक्रमणांची ही मालिका सुरू झाली. महमूद इतका विध्वंसक शासक होता की लोक त्याला मूर्ती तोडणारा म्हणू लागले.

  सोमनाथ मंदिरावर केला होता हल्ला

  1026 मध्ये काठियावाडमधील सोमनाथ मंदिरावर महमूदचा सर्वात मोठा हल्ला झाला. देशाच्या पश्चिम सीमेवर प्राचीन कुशस्थळी आणि सध्याच्या सौराष्ट्र (गुजरात) काठियावाडमध्ये सागर किनार्‍यावर सोमनाथ महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. याचा उल्लेख स्कंदपुराणात आहे. चालुक्य वंशातील भीम पहिला हा काठियावाडचा राजा होता. महमूदच्या हल्ल्याची माहिती मिळताच तो पळून गेला. महमूदने सोमनाथ मंदिराचे शिवलिंग तोडले. मंदिर पाडले. हजारो पुजारी मारले गेले आणि त्याने मंदिरातील सोने आणि प्रचंड खजिना लुटला. असं सांगण्यात येत.