टोकियो पॅरालिम्पिक्स विजेत्या भाविना पटेल यांना एमजी मोटरने ‘हेक्टर’ भेट दिली

ही एसयुव्ही ॲक्सेलरेटर व ब्रेक्सना ऑपरेट करण्यासाठी हाताने नियंत्रित करता येणारे लेव्हर अशी सुरक्षितताविषयक वैशिष्ट्ये, तसेच उत्तमरित्या डिझाइन केलेल्या व्हीलचेअर अटॅचमेंट्ससह आनंददायी ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी रिडिझाइन करण्यात आली आहे.

  • कस्टमाइज्ड एसयुव्ही: ॲक्सेलरेटर व ब्रेक्सना ऑपरेट करण्यासाठी हाताने नियंत्रित करता येणार

मुंबई : एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) दि वडोदरा मॅरेथॉन यांच्यासोबत सहयोगाने टोकियो पॅरालिम्पिक्स २०२० (Tokyo Paralympics 2020) रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल (Silver medalist Bhavina Patel) यांना कस्टमाइज्ड एमजी हेक्टर भेट (Customized MG Hector Gift) म्हणून दिली. भारताची पहिली इंटरनेट-कनेक्टेड एसयुव्ही हेक्टर भारतीय पॅरा-ॲथलीटसाठी कस्टमाइज्ड करण्यात आली आहे.

ही एसयुव्ही ॲक्सेलरेटर व ब्रेक्सना ऑपरेट करण्यासाठी हाताने नियंत्रित करता येणारे लेव्हर अशी सुरक्षितताविषयक वैशिष्ट्ये, तसेच उत्तमरित्या डिझाइन केलेल्या व्हीलचेअर अटॅचमेंट्ससह आनंददायी ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी रिडिझाइन करण्यात आली आहे. या वेईकलमध्ये प्रभावी ड्राइव्हसाठी सुपर-स्मार्ट डीसीटी ट्रान्समिशन आणि स्टार्ट/स्टॉप बटन देखील आहे. एमजी मोटर इंडियाचे चीफ टेक्निकल ऑफिसर जयंत देब यांच्या हस्ते भाविना पटेल यांना वैयक्तिकृत हेक्टर सुपूर्द करण्यात आली.

ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल म्हणाल्या, “मी एमजी मोटर व वडोदरा मॅरेथॉन यांच्या या विचारशील गेस्चरचे कौतुक करते. मला ही पूर्णत: कस्टमाइज्ड हेक्टर माझ्या मालकीची असण्याचा खूप आनंद होत आहे. ही आकर्षक वेईकल आपल्या गतीशीलता परिसंस्थेमधील अग्रणी नवोन्मेष्कार आहे. मी ड्रायव्हरच्या आसनावर या वेईकलची क्षमता अनुभवण्यास खूपच उत्सुक आहे. गतीशीलतेसह ही आकर्षक कार मला स्वावलंबीपणा व सक्षमीकरणाची भावना देते.”

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “एमजीआय विविधता व सर्वसमावेशकतेला प्राधान्य देते आणि ते आमच्या ब्रॅण्ड आधारस्तंभांचे भाग देखील आहेत. एमजीमध्ये आम्ही वुमेन्टोरशीप व ड्राइव्हहरबॅक यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच महिलांना प्रोत्साहित करण्यासोबत पाठिंबा देतो. आज आम्हाला टोकियोमध्ये देशाचे नावलौकिक केलेल्या भाविना यांच्यासाठी आमची एमजी हेक्टर कस्टमाइज्ड करण्याबाबत सन्माननीय वाटत आहे. यासह आम्ही त्यांचे धैर्य व निर्धाराला सलाम करतो. त्यांनी सर्व विषमतेवर मात करत संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. महिला सक्षमीकरणाप्रती त्यांचे योगदान अद्वितीय आहे. आम्ही आशा करतो की, त्या आमच्या प्रशंसनीय भेटीचा आनंद घेतील.”

वडोदरा मॅरेथॉनच्या अध्यक्ष तेजल अमीन म्हणाल्या, “आम्ही नेहमीच आमच्या ॲथलीट्सचे फिटनेस व स्वास्थ्याला प्राधान्य देत आलो आहोत. आमचा ॲथलीट्सचे उत्तम पोषण करण्यावर दृढ विश्वास आहे, ज्यामुळे त्यांना त्यांची ध्येये संपादित करण्यामध्ये मदत होते. आम्हाला आनंद होत आहे की, भाविना पटेल यांना एमजी मोटरची अद्वितीय कस्टमाइज्ड वेईकल भेट देण्यात आली आहे.”