राष्ट्रविकास सेनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

    सांगली : केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी चूका करून माफी मागण्यापेक्षा केलेली चूक सुधारायची असेल तर लो. अण्णा भाऊ साठे यांना तात्काळ भारतरत्न द्या, लोकशाहीर अण्णा भाऊं साठेंचा अवमान महाराष्ट्रातील व देशातील जनता कधीही सहन करणार नाही  राष्ट्र विकास सेनेच्या वतीने पुष्पराज चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी करण्यात आली.

    केंद्रीय सामाजिक न्याय विभाग अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर फौंडेशन चे अध्यक्ष विकास त्रिपाठी यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे इतर महापुरुषांच्या तुलनेत इतके प्रसिद्ध नाहीत असं दर्शवून अवमानकारक लेखी उत्तर देऊन प्रबोधनकार यादीत नाव न टाकल्याचे पत्र पाठवले होते,वास्तविकता राज्य शासनाने तसा प्रस्ताव पाठवणे अपेक्षित असूनही राज्य सरकार व केंद्र सरकारने संबंध देशातील मातंग समाजाच्या भावना दुखावल्या, त्यामुळं भाजपा केंद्रीय सरकार व मंत्री व महाराष्ट्र राज्य सरकार चा जाहीर निषेध करण्यात आला, यावेळी राष्ट्रीय विकास सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.