Minister Eknath Shinde Did Tribal Dance

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासीच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आदिवासी तरुणांसह पारंपारिक नृत्य केले(Minister Eknath Shinde Did Tribal Dance)

    गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासीच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आदिवासी तरुणांसह पारंपारिक नृत्य केले(Minister Eknath Shinde Did Tribal Dance)

    आज पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांच्यासमोर स्थानिक आदिवासी तरुणांनी पारंपरिक रेला नृत्य सादर केलं.

    यावेळी नृत्य सादर करणाऱ्या तरुणांनी शिंदे यानांही पारंपरिक आदिवासी टोपी परिधान करण्याची विनंती करीत या नृत्यात सहभागी होण्याचा प्रेमळ आग्रह केला. त्यामुळे त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत त्यांनी या नृत्यात सहभाग घेतला.