In touch with nine Congress MLAs Devendra Fadnavis and Eknath Shinde, Minister Uday Samant informed
In touch with nine Congress MLAs Devendra Fadnavis and Eknath Shinde, Minister Uday Samant informed

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन (Barsu Refinery) वाद होताना दिसत आहे. याला तीव्र विरोध केला जात आहे. त्यात आता बारसू रिफायनरी प्रकल्पावरूनच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची 'सिल्व्हर ओक'वर जाऊन भेट घेतली. यादरम्यान अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

    मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन (Barsu Refinery) वाद होताना दिसत आहे. याला तीव्र विरोध केला जात आहे. त्यात आता बारसू रिफायनरी प्रकल्पावरूनच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन भेट घेतली. यादरम्यान अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

    उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन बारसू रिफायनरीवर राज्य सरकारची काय भूमिका आहे, याची माहिती दिली. त्याबाबत सामंत म्हणाले, ‘काल बारसू रिफायनरी येथील आंदोलकांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाली. त्यानुसार आज शरद पवार यांना भेटण्याचं ठरलं होतं. तिथली वस्तूस्थिती काय आहे, हे शरद पवार यांना सांगितलं. आंदोलनकर्त्यांचा गैरसमज दूर झाल्याशिवाय बारसू रिफायनरी हा प्रकल्प पुढे रेटणार नाही. त्या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली’.

    सरकार आंदोलकांशी बोलायला तयार

    ‘शासन आंदोलकांच्या प्रमुखांशी बोलायला तयार आहे. स्थानिकांशी बोलूनच पुढील निर्णय घेतला जाईल. कुणासोबतही जबरदस्ती केली जाणार नाही.

    सध्या फक्त मातीपरीक्षण

    हे फक्त मातीपरीक्षण आहे. त्यानंतर कंपनी ठरविलं की प्रकल्प होणार की, नाही. नोटीस मागे घेण्यासंदर्भात शासन चर्चा करायला तयार आहे’, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

    सत्यजित चव्हाण यांनीही घेतली होती भेट

    बारसू आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण (Satyajit Chavan) यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर कालच शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता उदय सामंत यांनी पवार यांची भेट घेतली.