
शेलार यानी आरोप केला होता की, करण जोहरच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीतील सीमा खान, अमृता अरोरा आणि करीनाला कोरोना झाल्याच्या बातम्या वाचल्या. करण जोहरच्या घरी जी पार्टी होती त्यात किती लोक होते? त्या सर्वांची टेस्ट झाली का? असे प्रश्न त्यांनी विचारले.
मुंबई, सिने निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आयोजीत केलेल्या पार्टीवर भाजप नेते आशिष शेलार प्रश्न उपस्थित करत त्या पार्टीमध्ये राज्य सरकारचा एक मंत्री सहभागी होता, असा आरोप केला होता. त्यानंतर राज्य सरकारने खुलासा करताना बाधित रुग्णांनी दिलेल्या माहितीवरुन केलेल्या चाचणीनुसार आठ जण पार्टीत होते. त्यांच्या जवळच्या संपर्कातील सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती दिली आहे.
कॅम्प भरवून ११० जणांच्या कोविड चाचण्या
राज्य सरकारने या बाबत स्थानिक प्राधिकरण असलेल्या मुंबई महापालिका आणि पोलीसांकडून कारवाई केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. बाधित रुग्णांचा वावर असलेल्या तीन इमारतींमध्ये कोविड टेस्टींग कॅम्प भरवून ११० जणांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या परंतु, या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. करण जोहरच्या इमारतीतील एकूण ५४ चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत.
पेज थ्री पार्टीत मंत्री विथ करन
शेलार यानी आरोप केला होता की, करण जोहरच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीतील सीमा खान, अमृता अरोरा आणि करीनाला कोरोना झाल्याच्या बातम्या वाचल्या. करण जोहरच्या घरी जी पार्टी होती त्यात किती लोक होते? त्या सर्वांची टेस्ट झाली का? असे प्रश्न त्यांनी विचारले. या पार्टीत किती लोक होते यावरून संशय निर्माण होत आहे.” असे मत शेलार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर सरकारने खुलासा करत मंत्री असल्याचे मान्य केले मात्र कुणीही बाधित रूग्ण असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.