मिरज वैद्यकीय महाविद्यालयात आणखी ५० जणांना कोरोना

मिरजेत कोरोना संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत चालली आहे. सलग तिसऱ्या दिवशी बुधवारीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा विस्फोट झाला.

    मिरज : मिरजेत कोरोना संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत चालली आहे. सलग तिसऱ्या दिवशी बुधवारीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा विस्फोट झाला.

    संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकशे दहा जणांची कोरोना चाचणी केली असता पुन्हा ५० विद्यार्थी बाधित आढळले आहेत. एकट्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधितांचा आकडा ८२ वर पोहचला आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठणठणीत असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

    गेट टू गेदर कार्यक्रम, कॅन्टीनमध्ये सामूहिक नाष्टा, वाढदिवसाच्या पार्ट्या तसेच सुट्टी निमित्त परगावी जाऊन आलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कातून मिरज वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा फैलाव होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अचानक बाधितांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रासह शहरात खळबळ उडाली आहे.