‘जलजीवन मिशन’च्या कामांना गती देण्यासाठी ‘मिशन ९० दिवस’ : सीईओ दिलीप स्वामी

जलजीवन मिशनचे (Jaljivan Mission) कामात हालगर्जीपणा करू नका. अन्यथा कारवाईला सामोरे जा. कामांना गती देण्यासाठी मिशन 90 दिवस कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी दिला.

    सोलापूर : जलजीवन मिशनचे (Jaljivan Mission) कामात हालगर्जीपणा करू नका. अन्यथा कारवाईला सामोरे जा. कामांना गती देण्यासाठी मिशन 90 दिवस कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी दिला.

    जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात आज जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता, शाखा अभियंता व बीआरसी व सीआरसी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आढावा मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रशांत डी. एफ. कोळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.

    दिलीप स्वामी म्हणाले, लोकांना पाणी देणे हे पुण्याचे काम आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी ९० दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे. या कामांना मिशन नोडमध्ये घ्या. प्रति माणसी ५५ लिटर पाणी १२ तास देण्यासाठी नियोजन करा. पाणी कुणाला नको आहे. टॅंकर लागणार नाही या दृष्टीने नियोजन करा. स्त्रोत निश्चित करा. १५ लाख रूपये पर्यंतचे कामाचे मान्यतेचे अधिकारी ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. १५ वा वित्त आयोगातील निधीमध्ये तरतूद करण्यात आली आहे. जर तसे केले नसल्यास तरतूद करा. कारणे सांगू नका, असेही ते म्हणाले.

    नोव्हेंबरअखेर १० ते १५ लाख रूपये अंदाजपत्रक असले ९४ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये रेट्रोफिटींगच्या ७२ व नवीन योजना असलेले २२ ग्रामपंचायतींना यामध्ये १५ दिवसात अंदाजपत्रके करून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक आहे. तसेच रेट्रोफीटींगची कामे असलेली १५ लाख ते एक कोटीपर्यंतचे ५५० ग्रामपंचायती आहेत. नवीन योजनांसाठीच्या १०३ ग्रामपंचायती आहेत. कामाचे योग्य नियोजन करून अंमलबजावणी करा. या हयगय खपवून घेणार नाही.