
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील 'मॅन ऑफ कमिटमेंट' म्हणजे आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) आहेत. गेल्या २० वर्षांत समाविष्ट गावांतील विकास आणि राजकीय प्रतिनिधीत्वाबाबत अन्याय झाला. मात्र, आमदार लांडगे यांनी खऱ्या अर्थाने समाविष्ट गावांच्या विकासाला चालना दिली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘मॅन ऑफ कमिटमेंट’ म्हणजे आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) आहेत. गेल्या २० वर्षांत समाविष्ट गावांतील विकास आणि राजकीय प्रतिनिधीत्वाबाबत अन्याय झाला. मात्र, आमदार लांडगे यांनी खऱ्या अर्थाने समाविष्ट गावांच्या विकासाला चालना दिली. पिंपरी-चिंचवड शहराला स्पोर्ट्स सिटी करणारे आमदार लांडगे असे एकमेव नेते आहेत. ज्यांचा वाढदिवस किमान महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. कभी-कभी दवा सें दुवाँ जादा काम करती है…अशा उक्तीप्रमाणे आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत, अशी भावना भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केली.
इंद्रायणीनगर येथे पिंपरी- चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाणचे संस्थापक योगेश लोंढे व नगरसेविका नम्रता लोंढे यांच्यातर्फे क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत ‘‘न्यू होम मिनीस्टर’’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी भाजपा नेत्या चित्रा वाघ, भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, वसंत लोंढे, शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे, नगरसेविका सारिका लांडगे, सोनाली गव्हाणे, स्विनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, साधना मळेकर, निलेश बोराटे, भाऊ रासकर, प्रदीपतापकीर, कार्तिक लांडगे, दत्ता गव्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी दिनदर्शिका- २०२२ चे अनावर करण्यात आले.
मान्यवरांकडून लोंढे दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक…
चित्रा वाघ म्हणाल्या की, इंद्रायणीनगर परिसरात लोंढे दाम्पत्य अतिशय ‘ग्राउंड लेवल’ला काम करत असतात. लहान मुलांनी जरी फोन केला आणि किरकोळ कामेसुद्धा ते जाऊन स्वतः करतात. सकाळी सोशल मीडिया उघडली, तर हे दोघे हमखास प्रभागातील कामानिमित्त कुठे ना कुठंतरी दिसतातच, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी कौतूक केले. तसेच, समाजसेवेसाठी सदैव आघाडीवर असलेले लोंढे दांपत्याने आपल्या कार्याने लोकांची मने जिंकली आहेत. वैकुंठ रथ सुविधा सुरू करणाऱ्या लोंढे कुटुंबाची समाजाप्रती असलेली सेवाभावी वृत्ती लक्षात येते, असे गौरोवोद्गार भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी काढले.
राज्यात सध्या दोन नंबरी सरकार…
चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्यात सध्या दोन नंबरी सरकार आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या गृहमंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा द्यावा लागला आहे. एखाद्या आयपीएस ऑफीसरने गृहमंत्र्यावर आरोप केले आहेत. रोज अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे निघाली आहेत. त्यामुळे महिलांनी आपले रक्षण स्वत:च करावे. कारण, हे सरकार आपले रक्षण करण्यासाठी सक्षम नाही. महाराष्ट्राची इतकी वाईट परिस्थिती या सरकारने केली आहे, की छत्रपती शिवाजी महाराज यांनी या सरकारचा कडेलोट केला असता, असा घणाघातही चित्रा वाघ यांनी केला.
लोंढे दाम्पत्याचे कार्य उल्लेखनीय : आमदार लांडगे
इंद्रायणीनगर परिसरातील लोकांच्या मदतीसाठी सतत धडपणारी नगरसेविका नम्रता लोंढे आणि योगेश लोंढे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोविड काळात प्रत्येक घरातील आनंदोत्सव असो किंवा दुख:चा प्रसंग असो प्रत्येक समस्येला धावून जाणारे हे लोंढे दांम्पत्य आहे. प्रभागातील युवक आणि महिला भगनींशी आपुलकीचे नाते या दांम्पत्याने निर्माण केले आहे. वैकुंठरथाच्या निमित्ताने आणखी एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे मी केलेली निवड सार्थ आहे, असा विश्वास आणि अभिमान वाटतो, अशा भावनाही आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
पिंपरी-चिंचवड पुन्हा भाजपचा महापौर : योगेश टिळेकर
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करायच्या असतील आणि शिरुरसह पिंपरी-चिंचवडचा आवाज दिल्लीत घुमवायचा असेल, तर आपण आमदार महेश लांडगे यांच्या पाठिशी उभा राहिले पाहिजे. इतकेच नाही, तर पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार लांडगे आणि जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा भाजपाचा महापौर होईल, असा विश्वास आहे. आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडचे अनेक प्रश्न पोटतिडकीने मांडले आहेत. कोविड संकट, नैसर्गिक संकटाच्याकाळात आमदार लांडगे लोकांच्या मदतीसाठी धावलेले आहेत. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे असतील, तर महेश लांडगे यांना साथ दिली पाहिजे, असे मत भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी व्यक्त केले.