आपण या महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावं – मनसे आमदार राजू पाटील यांचा जरांगे पाटलांना सल्ला

कल्याण डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांच्या समस्येबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी स्टेशन परिसरातील फेरीवाल्याच्या विरोधात कारवाई केल्याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांचं कौतुक केलं.

  कल्याण : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण तापले आहे. मनोज जरांगे पाटील वीस तारखेला मुंबईत दाखल होणार आहेत. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विषय इतका सोपा नाही. पहिले सरकार बरं बरं बोलत होते आता खर खंर बोलत आहे हे मी या अगोदरच स्पष्ट केलं आहे. कारण कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला इमपेरिकल डाटा जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून संख्या घ्यावी लागेल. जनगणना आवश्यक आहे, या सर्व प्रक्रियेला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे सरकारने जेव्हा जरांगे पाटील यांची भेट घेतली तेव्हाच स्पष्ट करायला पाहिजे होते, की या गोष्टी साठी थोडा वेळ जाणार आहे आणि हे सत्य आहे. सरकारने अजूनही स्पष्ट बोलायला सुरुवात केली पाहिजे. सरकारने त्याचवेळी जरांगे पाटील यांना स्पष्ट सांगायला पाहिजे होते. त्यांना तेव्हा समजून सांगितलं असत तर ही वेळ आली नसती. सरकारने ज्या मुठी झाकून ठेवल्या आहेत त्यामुळे ही वेळ आली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. मुंबईमध्ये त्यांचं स्वागत आहे. मात्र आरक्षणासाठी आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, आपण या राज्याचे सुपुत्र आहोत याच भान ठेवुन सर्वांनी आंदोलन करावं. आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहे असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

  जानेवरीच्या २२ तारखेला अयोध्येमधील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यासाठी मोदी सरकारकडून पाठवण्यात आलेल्या निमंत्रणांवरून सध्या राजकारण पेटले आहे. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी कोणाला आमंत्रण दिले किंवा नाही दिले हे मला माहित नाही. परंतु प्रभू राम चंद्रांचा विषय हा सर्व हिंदूंच्या आस्थेचा आहे. यात कोणी राजकारण आणू नये किंवा तस कोणी पाहूही नये. आमंत्रण आले किंवा नाही आले तरी प्रभू राम चंद्रांचा नाव घेऊन सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला पाहिजे असा सल्ला राजकीय पक्षाना दिला आहे.

  मनसे आमदार राजू पाटील यांनी अप्रत्यक्ष रित्या साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

  एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून सहा ते सात वेळा राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. एक दोन वेळेला मी सुद्धा सोबत होतो. सातत्याने राज्यातले वेगवेगळे विषय घेऊन राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री हे काही सूचना मान्य करतात, कामे होत आहेत म्हणून राज ठाकरे हे भेट घेतात. यापूर्वी अस होत नव्हतं आमच्या सूचना विचारात घेतल्या जात नव्हत्या, म्हणून राज ठाकरे जात नव्हते. आता जे प्रश्न मांडले जात आहेत त्यांना मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद एकनाथ शिंदे यांच्याकडून दिला जात असल्याने राज ठाकरे त्यांची भेट घेत आहेत.

  फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत मनसे आक्रमक

  कल्याण डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांच्या समस्येबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी स्टेशन परिसरातील फेरीवाल्याच्या विरोधात कारवाई केल्याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांचं कौतुक केलं. यावेळी बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी जेव्हा त्यांची नियुक्ती झाली तेव्हा त्यांना आम्ही शुभेच्छा द्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांना सांगितले होते की, दोन्ही शहरं तुम्ही समजून घ्या त्यानंतर आम्ही काही मागण्या घेऊन तुमच्या कडे येतो. तूर्तास इच्छाशक्ती असेल तर हा स्टेशन परीसर सुधारला जाऊ शकतो. डीपी रोडच्या मध्ये आलेली अनधिकृत कामे हटवून लोकांना चांगला दिलासा दिला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने प्रशासनाने कामे सुरू केली आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. या गोष्टी एका झटक्यात होऊ शकत नाही कारण या ज्या वाईट सवई आहेत त्या इथल्या राज्यकर्त्यांनी लावून ठेवल्या आहेत. डोंबिवली पूर्वेला राजकीय पक्षाचे पदाधिकारी हप्ते घेऊन फेरीवाल्यांना बसवतात आणि जे जगजाहीर आहे, म्हणूनच फेरीवाल्यांच्या विषयावर फक्त मनसेच बोलताना दिसते बाकी कोणी पक्ष बोलत नाही. पण सध्या चांगली सुरुवात सध्याच्या आयुक्तांनी केली आहे. आमचा त्यांना पाठींबा आहे, जर कोणी अशी दादागिरी करत असेल तर आम्हला सूट दिली तर आम्हीही त्यांच्या सोबत येऊ असा इशारा दिला आहे.