दिग्गज माजी खेळाडूंमध्ये लाईव्ह शो दरम्यान शाब्दिक वाद, कोणाला मिळणार संधी केएल राहुल की ईशान किशन?

राहुलच्या निवडीवरून गौतम गंभीर आणि मोहम्मद कैफ या माजी खेळाडूंमध्ये लाईव्ह शो दरम्यान शाब्दिक वाद झाला.

    कैफ VS गंभीर : भारत विरुद्ध पाकिस्तान कालचा सामना पावसामुळे रद्द झाला. हा हायव्होल्टेज सामना रद्द झाल्यामुळे अनेक क्रिकेट चाहते उदास झाले. भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानच्या संघाने ४८.५ षटकांत भारताचा संपूर्ण संघ २६६ धावांत माघारी पाठवला. त्यानंतर मैदानात पावसाने दमदार फटकेबाजी केली आणि मॅच रद्द करावी लागली. भारताचा संघ केएल राहुलच्या अनुपस्थितीत ईशान किशनला या सामन्यात संधी मिळाली आणि त्याने ८१ चेंडूंत ८२ धावांची खेळी करून पाकिस्तानची हालत खराब केली.

    हार्दिक पांड्यासोबत त्याने ८७ चेंडूंमध्ये १३८ धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, आता राहुल पूर्णपणे फिट झालाय अन् तो आशिया चषकासाठी श्रीलंकेत दाखल होणार आहे. राहुल येताच प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान पक्के होईल आणि इशानला बाहेर बसावे लागेल. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही राहुलच पहिली पसंती आहे. राहुलच्या निवडीवरून गौतम गंभीर आणि मोहम्मद कैफ या माजी खेळाडूंमध्ये लाईव्ह शो दरम्यान शाब्दिक वाद झाला. इशानला बॅक अप यष्टिरक्षक म्हणून नेहमी निवडले जाते. त्याने वन डे क्रिकेटमध्ये जलद द्विशतक झळकावले आहे आणि त्याने मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करून दाखवलं आहे. तरीही राहुलचे पुनरागमन होताच त्याला राखीव म्हणूनच पाहिले जाईल. पाकिस्तान विरुद्धही ४ बाद ६६ धावा अशा दयनीय अवस्थेत भारतीय संघ असताना इशान मैदानावर आला अन् ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

    या सामन्यानंतर कैफने एक मुद्दा छेडला. राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर भारतीय संघाने काय करायला हवं, असे कैफने विचारले. त्याने ८२ धावा करणाऱ्या इशानच्या जागी थेट राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळायला हवी, असे मत मांडले. कारण, राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता, खराब फॉर्मामुळे नाही. तो म्हणाला,”लोकेश राहुलने स्वतःला मॅच विनर म्हणून सिद्ध केले आहे. पाचव्या क्रमांकावर त्याने दमदार कामगिरी केली आहे आणि त्यामुळेच राहुल द्रविडच्या डोक्यात त्याच्याबद्दल स्पष्टता आहे. केएल फिट झाला, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवायला हवे अन् इशानला पुढच्या संधीची वाट पाहायला हवी. इशानने चांगली कामगिरी केली आहे. त्याने अनेक विक्रमी खेळी केल्या आहेत, परंतु तो आता राहुलला रिप्लेस करू शकत नाही.” असे गौतम गंभीर म्हणाला.