So far action has been taken against 113 gangs
Pune Crime

  पुणे : पुण्याच्या मध्यभागात व्यावसायिकांना तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या रोहन चव्हाण व टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील तब्बल ८१ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. ८१ टोळ्यांमध्ये साडेपाचशे गुन्हेगार कारागृहात गेले आहेत.

  सहा जणांवर मोक्का कारवाई

  किरण रमेश गालफाडे (वय २४ रा. मंगळवार पेठ), जतिन संतोष पवार (वय २१ रा. बिबवेवाडी), अक्षय संजय सगळगिळे (वय २० रा. लोहगाव) यांना अटक केली असून, टोळी प्रमुख रोहन जयदीप चव्हाण, ऋषिकेश फुलचंद रवेलिया (वय २१ रा. लोहगाव) व एक साथीदार फरार आहेत. अशा सहा जणांवर मोक्का कारवाई करण्यात आलेली आहे.

  व्यावसायिक व कामगारांना तलवारीचा धाक दाखवत शिवीगाळ

  बुधवार पेठेतील व्हिडीओ पार्लरच्या दुकानात घुसून व्यावसायिक व कामगारांना तलवारीचा धाक दाखवत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, गल्ल्यातील रोख ५ हजार ३६० रुपये चोरून नेले होते. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली होती. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  तिघेजण हातात तलवारी घेऊन व्हिडिओ पार्लरमध्ये दाखल

  दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना साक्षीदारांकडे देखील चौकशी केली. तेव्हा व्हिडिओ पार्लरच्या बाहेरील पानटपरीवर व्यवसाय करत असताना सहा अनोळखी दुचाकीवरुन आले. त्यापैकी तिघेजण हातात तलवारी घेऊन व्हिडिओ पार्लरमध्ये गेले. त्यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन हातातील तलवार हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तर पानटपरीच्या गल्ल्यातून १ हजार ७५० रुपये घेऊन निघून गेल्याचे समोर आले.

   

  तसेच, आरोपींकडून संघटितपणे गुन्हे करण्यात येत असल्याचे दिसून आले. दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे केल्याचे समोर आल्यानंतर फरासखाना पोलिसांनी टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांच्यामार्फत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता. पोलीस आयुक्तांनी टोळीवर मोक्का कारवाईचा आदेश दिले.