
भोपाळ : मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एक लाजिरवाणा व्हीडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही तरुण एका मुलीचा विनयभंग करीत आहेत. हा व्हीडिओ काही दिवसांपूर्वी झालेल्या भगोरिया महोत्सवामधील आहे. आदिवासीबहुल अलीराजपूरच्या बालपूर गावात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, एका मुलीवर काही मुलांनी धावून जात तिचा विनयभंग केला(Molestation of a young woman; On the way, the mob pulled into the group).
आता या घटनेचा व्हीडिओ आता समोर आला आहे. मुलगी तिथे उभ्या असलेल्या कारच्या मागे लपण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, तिथून जात असलेल्या एका टोळक्यातील तरुण धावत येतो आणि तिला अश्लीलपणे स्पर्श करू लागतो.
यानंतर काही वेळातच आणखी एका तरुणाने तिला ग्रुपमध्ये ओढले आणि ग्रुपमधील सर्व सदस्यांनी तिचा विनयभंग केला. तरुणी आणि तरुण शेजारच्या धार जिल्ह्यातील एकाच गावातील रहिवासी होते.