माझा जास्त वेळ जुन्या गोष्टी शोधून त्या दुरुस्त करण्यातच जात आहे; मोदींचा विरोधकांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे सभेत बोलताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी “माझा 7 वर्षांचा कालखडं तपासून पाहा, जुन्या गोष्टी दुरुस्त करण्यातच तो गेला आहे,” असा टोला नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे सभेत बोलताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी “माझा 7 वर्षांचा कालखडं तपासून पाहा, जुन्या गोष्टी दुरुस्त करण्यातच तो गेला आहे,” असा टोला नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे.

    मोदी नेमकं काय म्हणाले? 

    माझा 7 वर्षांच्या कारभाराचा रेकॉर्ड तपासून पाहा. मी जुन्या गोष्टी शोधून त्या दुरुस्त करण्याच्या मागे लागलो आहे. यातचं माझा जास्त वेळ जात आहे. आता मी सर्व कामांची दुरुस्ती करत आहे. तुम्ही त्यांना दुरुस्त करा,” असंही नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या जनतेला संबोधित करताना म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मोदी सरकार आल्यापासून झालेल्या कामाचांही उल्लेख केला आहे. हल्द्वानी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जवळपास 2 हजार कोटी रुपयांची योजना इंथ सुरु आहेत. आता हल्द्वानीमध्ये पाणी, सांडपाणी, रस्ते पार्कींग, रस्त्यावरचे दिवे अशा सर्व बाबींमध्ये अभूतपूर्व सुधारणा झालेली तुम्हाला पाहायला मिळेलं. यंदाचं दशक उत्तराखंडचं दशक ठरणार आहे, असं आश्वासनही मोदींनी यावेळी दिलं आहे.

    दरम्यान, नरेंद्र मोदींनी यावेळी सभेत 17,500 कोटी रुपयांच्या एकूण 23 योजनांची घोषणा केली. 23 योजनांमध्ये एकूण 14,100 कोटीं रुपयांहून अधिक निधीच्या 17 प्रकल्पांच्या भूमीपूजन पार पडलं. यात सिंचन, रस्ते, आवास, आरोग्य, सुविधा, उद्योग, स्वच्छता, पिण्याचं पाणी यांच्याशी संबंधित सुविधांचा समावेश आहे.