केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना मातृशोक

    कल्याण : केडीएमसीचे (KDMC) आयुक्त (Commissioner) डॉ. विजय सूर्यवंशी (Dr. Vijay Suryavanshi) यांच्या मातोश्री (Mother) सुशीला नामदेव सूर्यवंशी यांचे वयाच्या ८२ वर्षी रविवारी निधन (Passed Away) झाले. प्राथमिक शाळेत शिक्षिका ते मुख्याध्यापिका हा त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास त्यांनी देवाळा परिसरात पूर्ण केला. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. शिस्त, संस्कार, आदर्श बनविण्याचे धडे त्यांनी विद्यार्थ्यांना देत लोकसेवेचा वसा अखेरपर्यंत सुरू ठेवला.

    सामाजिक, कला, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असल्याने जनसामान्यासाठी त्यांची भरीव कामगिरी होती. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीतील लोकसेवेचा वसा घेतलेले व्यक्तिमत्व हरपल्याने समाजातील सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.