MP Navneet Rana has verbally attacked Yashomati Thakur, saying that she has got the post of Guardian Minister by mistake.

झारखंडमधील चत्राचे भाजप खासदार सुनील कुमार सिंह हे या 15 सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत. सध्या समितीमध्ये एक जागा रिक्त आहे.

    खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अटकेसंदर्भात आज लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नवनीत राणा यांनाही आपली बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजता संसद भवन अॅनेक्सी एक्स्टेंशन इथे बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत खासदार नवनीत राणा आपली मुंबईतील अटक आणि त्यानंतर पोलीस ठाण्यातील गैरव्यवहाराबाबत बाजू मांडणार आहेत.

    नवनीत राणा यांनी 25 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयाला पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली होती. लोकसभा खासदार असल्याने नवनीत राणा यांची तक्रार लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आली होती. झारखंडमधील चत्राचे भाजप खासदार सुनील कुमार सिंह हे या 15 सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत. सध्या समितीमध्ये एक जागा रिक्त आहे.